Karnataka Election 2023 : 'युवराज' राहुल गांधींचा 'हट के अंदाज' कधी कुल्फी तर कधी डोसा

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) आणि जेडीएस (JDS) या तीन पक्षात थेट लढत आहे. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कर्नाटकमध्ये प्रचारसभा आणि रॅली घेत धुरळा उडवून दिला. तर काँग्रसेच्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) या प्रमुख नेत्यांनी कर्नाटक पिंजून काढला. आरोप-प्रत्यारोपांनी राजकारणही तापलं.

राजीव कासले | May 08, 2023, 21:31 PM IST
1/6

कर्नाटक विधानसभेसाठी सर्व नेते प्रचारसभा आणि रॅली घेत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वेगळी वाट निवडली. राहुल गांधी यांनी थेट सर्वसामान्यांमध्ये जात त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचा हा साधेपणा लोकांना खूपच भावला.

2/6

कर्नाटकमधल्या निवडणूक प्रचारात राहुल गांधींचा हा साधासुधा अंदाज पाहायला मिळाला. एका डिलिव्हरी बॉयच्या स्कुटीवरून त्यांनी मस्त फेरफटका मारला. एसपीजी आणि सुरक्षारक्षकांचा गोतावळा लांब ठेवून ते स्कुटीवरुन बिनधास्त फिरत होते.

3/6

त्याआधी त्यांनी घराघरात फूड पार्सल पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजसोबत मसाला डोसा खाण्याचा आस्वाद लुटला. एवढंच नव्हे तर त्यांचं रोजचं हलाखीचं जगणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

4/6

राहुल गांधींचा हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. त्यांनी एका लहानग्या मुलासोबत त्यांनी कुल्फी खाण्याचा आनंद लुटला आणि तिच्याबरोबर छान गट्टीही जमवली.

5/6

एवढंच नाही तर बंगळुरू महापालिका परिवहन सेवेच्या खचाखच भरलेल्या बसमधून त्यांनी प्रवास केला. प्रवाशांसोबत गप्पा मारल्या.निवडणूक प्रचार म्हटला की, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका, वाद असं सगळं आलं... मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत राहुल गांधींचा हा हटके अंदाज चांगलाच लक्षवेधी ठरलाय.

6/6

कर्नाटकचा कौल कुणाला, हे येत्या 13 मे रोजी निकालातून समजलेच. मात्र सध्या तरी राहुल गांधींनी कानडी जनतेची मनं जिंकलीत, असं म्हणायला हरकत नसावी..