'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे? 

Soneshwar Patil | Nov 05, 2024, 18:01 PM IST
1/6

व्हॅनिटी व्हॅन

तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमधील कोणत्या सेलिब्रिटीकडे सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे. जाणून घ्या सविस्तर  

2/6

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या पहिल्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 48 लाख रुपये असून तिच्या दुसऱ्या व्हॅनची किंमत 75 लाख रुपये आहे. 

3/6

सलमान खान

सलमान खानची व्हॅनिटी व्हॅन कार डिझायनर दिलीप छाबड़िया यांनी केली आहे. रिपोर्टनुसार, सलमानच्या व्हॅनची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. 

4/6

शाहरुख खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या  व्हॅनिटी व्हॅनची डिझाइन दिलीप छाबड़िया यांनी केली आहे. त्याच्या व्हॅनची किंमत 4 कोटी रुपये इतकी आहे. 

5/6

कपिल शर्मा

दिलीप छाबड़िया यांनी कपिल शर्मासाठी देखील एक व्हॅनिटी व्हॅन डिझाईन केली आहे. या व्हॅनची किंमत 5.50 कोटी रुपये आहे. 

6/6

अक्षय कुमार

अक्षय कुमारची व्हॅनिटी व्हॅन ही सलमान खान आणि शाहरुख खानच्या व्हॅन पेक्षा महागडी आहे. रिपोर्टनुसार, अक्षयच्या व्हॅनची किंमत 5 कोटी रुपये आहे.