Kangana Ranaut: 'मधुबाला तारुण्यात जशा..', कंगना रणौतने मधुबाला यांच्याशीच केली स्वतःची तुलना

कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते.  आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे. 

Feb 23, 2023, 17:16 PM IST

Kangana Ranaut: कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते.  आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे. 

1/5

कंगनाने तिचे व मधुबाला यांचे काही फोटो कोलाज केले. हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत ती म्हणाली, “मी मोठ्या पडद्यावर मधुबाला यांची भूमिका साकारावी असं लोकांना वाटतं. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मधुबाला ऐन तारुण्यात जशा दिसत होत्या तशीच मी दिसायचे. पण अजूनही मी याबाबत ठाम नाही.”   

2/5

एक फोटो शेअर करत ती म्हणाली, “हे देवा, चित्रपटसृष्टीमध्ये हे माझं पहिलं वर्ष होतं.” या फोटोंमध्ये कंगनाची फॅशनही अगदी हटके असल्याचं दिसून येत आहे. 

3/5

मधुबाला यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. कंगना आज त्यांच्याशीच स्वतःची तुलना करत आहे. 

4/5

कंगनाने 2006 मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सध्या तिचे प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरत आहेत. 

5/5

कंगना आता तिच्या आगामी चित्रपटांना तरी यश मिळणार का? हे पाहावं लागेल.