Watermelon : कलिंगड गोड आहे का नाही हे कसं ओळखायचं ? सोप्या टिप्स जाणून घ्या...

उन्हाळा जवळ येऊ लागला आहे. मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. अशावेळी चवीला गोड आणि फ्रेश कलिंगड निवडताना काही टिप्स वापरल्या तर तुमची फसगत होणार नाही

Feb 23, 2023, 16:29 PM IST

उन्हाळा जवळ येऊ लागला आहे. मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. अशावेळी चवीला गोड आणि फ्रेश कलिंगड निवडताना काही टिप्स वापरल्या तर तुमची फसगत होणार नाही. 

1/5

कलिंगड हातात घ्या, त्यावर हाताने मारून पहा त्यातून जर आवाज आला तर ते पिकलेलं आहे. कलिंगडावर हात मारल्यानंतर जास्त आवाज आला तर समजा ते पिकलेलं आहे पण आवाज कमी आला तर ते कच्च असू शकतं.  

2/5

कलिंगडावर वरून हिरव्या जाड लाईन्स असतील आणि मधोमध पातळ लाईन्स दिसल्या कि, ते कलिंगड नक्की घ्या ते गोड असणारच. 

3/5

काळसर रंगाचे किंवा आधुनिक हिरव्या रंगाचे कलिंगड अधिक गोड असते.

4/5

आकारानुसार कलिंगड जड असेल तर ते जास्त गोड असतं, कारण बऱ्याचदा कलिंगड दिसायला मोठं दिसत. पण वजनाला हलकं असते. ते गोड लागत नाही. 

5/5

हलका पिवळा किंवा पांढरा रंग असलेलं कलिंगड अजिबात गोड नसत ते कच्चं असतं.