दीया मिर्जानंतर आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा

Aug 01, 2019, 18:48 PM IST
1/5

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जा आणि तिचा पती साहिल संघा यांनी वैवाहिक नात्याच्या बंधनातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका सेलिब्रिटी कपलनेही आपण विभक्त झाल्याचं सांगितलं. 

2/5

'जजमेंटल है क्या' चित्रपटाची लेखक-दिग्दर्शकाची जोडी कनिका ढिल्लन आणि प्रकाश कोवेलामुडी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कनिका ढिल्लन आणि प्रकाश कोवेलामुडी यांच्या लग्नाला केवळ 2 वर्षे झाली. मात्र आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत.   

3/5

कनिकाने एका वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही दोन वर्षांपूर्वी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर 'जजमेंटल है क्या' चित्रपटाची सुरुवात झाली असल्याचं कनिकाने सांगितलं. तर दुसरीकडे प्रकाश यांनी, माझा सोशल सर्कल हैदराबादमध्ये असल्याने मी हैदराबादमध्ये शिफ्ट झालो आणि कनिका मुंबईत आली असल्याचं सांगितलं.

4/5

26 जुलै रोजी 'जजमेंटल है क्या' चित्रपट प्रदर्शित झाला. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.   

5/5

दीया मिर्जानेही इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर करत, पती साहिल संघापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.