RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

Jul 09, 2020, 16:27 PM IST
1/5

RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतेला. जवळपास १९५० पासून ते अगदी २०१२ पर्यंत त्यांचा कलाविश्वातील हा प्रवास सुरुच होता. अभिनय क्षेत्रात अक्षरश: काळ आणि पिढ्या बदलताना पाहणाऱ्या या कलावंताला अखेर गुरुवारी मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला. माझगाव येतील शिया कब्रस्तान येथे लोकप्रिय अभिनेते आणि विनोदवीर जगदीप म्हणजेच सय्यद इश्तियाक अहमद जाफरी यांना सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. 

2/5

RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देतेवेळी जावेद आणि नावेद जाफरी या त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 

3/5

RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

अभिनेते जॉनी लिव्हर यांनीही यावेळी जगदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभनेत्याच्या खऱ्या नावापेक्षा जगदीप हीच ओळख जनमानसात रुजली होती. 

4/5

RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

जगदीप यांची एक्झिट कलाविश्वाला धक्का देऊन गेली. पण, त्यांनी साकारलेल्या 'सुरमा भोपाली'पासून इतरही असंख्य पात्रांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहेत. 

5/5

RIP Jagdeep : 'सुरमा भोपाली' सुपुर्द-ए-खाक

२०२० या वर्षी एकिकडे कोरोना व्हायरचा आघात होत असतानाच दुसरीकडे बऱ्याच सेलिब्रिटींनीही या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळं ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही, असं म्हणणं गैर ठरणार नाही. (सर्व छायाचित्रे सौजन्य- योगेन शाह)