'या' हॉटेलमध्ये मिळतो चक्क मास्कच्या आकाराचा परोटा

Jul 09, 2020, 14:17 PM IST
1/5

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता देशात विविध ठिकाणी जवळपास गेल्या चार मिहिन्यांपासून ल़ॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ज्यानंतर अनेक व्यवहार ठप्प झाले. हॉटेल व्यवसायालाही याचा फटका बसला. पण, आता मात्र अनलॉकचे टप्पे विविध स्तरांवर सुरु झाल्यामुळं याच व्यवहारांना पुन्हा एकदा गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसबाबतची दहशत आणि त्यापासून बचाव करण्यासाठीच्या उपायांना कमालीचं प्राधान्य देण्यात येत आहे. 

2/5

कोणी कोरोनापासून बचावासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी फलक लावत आहे, तर कोणी चक्क खाद्यपर्थांच्या माध्यमातून ग्राहकांचं लक्ष वेधत आहे. 

3/5

तामिळनाडूतील एका हॉटेलमध्ये सध्या चक्क मास्कच्या वापराविषयीची जनजागृती करण्यासाठी म्हणून मास्कच्याच आकाराच्या खाद्यपदार्थांची म्हणजेच परोट्याची विक्री केली जात आहे. 

4/5

मदुराई येथील एका हॉटेलमध्ये लढवण्यात येणारी ही शक्कल पाहता त्याविषयी व्यवस्थापक पूवलिंगम सांगतात, 'मास्क घालण्याकडं मदुराईतील नागरिकांचं अनेकदा दुर्लक्ष होतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये मास्कबाबत जनजागृती पसरवण्यासाठी म्हणून आम्ही हे मास्कच्या आकाराचे परोटे तयार केले आहेत'. 

5/5

नागरिकांना उमगेल अशाच मार्गानं जनजागृती करण्याचा हा फंडा सध्या साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. (सर्व छायाचित्रे- एएनआय)