मोबाईलवर लुटा IPL चा आनंद, Jio ने आणलेत 3 जबरदस्त प्लान; कमी किमतीत डेली 3GB डेटा आणि सर्वकाही

Jio and IPL 2023 : आयपीएलचा धमाका सुरु होण्याआधीच Jio ने आपल्या ग्राहकांसाठी जोरदार धमाका केला आहे. यामुळे आता कुठेही  IPL चा आनंद मोबाईलवर लुटता येणार आहे. Reliance Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी तीन जबरदस्त प्लान बाजारात आणले आहेत. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना आयपीएल क्रिकेटचा आपल्या मोबाईलवर आनंद घेता येणार आहे. Jio नवीन प्लान्ससह 40GB पर्यंत डेटा मोफत देत आहे, त्यामुळे आता डेटा वापराची चिंता न करता IPL सामने पाहता येणार आहेत.  IPL 2023 मधील पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. रिलायन्स जिओने यूजर्ससाठी तीन नवीन डेटा प्लान आणले आहेत.  

Mar 24, 2023, 10:00 AM IST

.

1/5

84 दिवसांची वैधता

84 दिवसांची वैधता

आपल्या मोबाईलवर आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत. कारण रिलायन्स Jio च्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 3GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली आहे. याशिवाय Jio वापरकर्त्यांना 241 रुपयांचे मोफत व्हाउचर देखील मिळणार आहे. ज्यामध्ये 40GB डेटा समाविष्ट आहे. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. 

2/5

399 रुपयांचा प्लान

 399 रुपयांचा प्लान

जिओने 28 दिवसांची वैधता असणारा 399 रुपयांच्या प्लान आणला आहे, ज्यामध्ये दररोज 3GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये 61 रुपयांचे मोफत व्हाउचर आहे आणि तुम्हाला 6GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

3/5

दररोज 3GB डेटा

दररोज 3GB डेटा

तसेच जिओने 219 रुपयांच्या प्लानमध्ये 14 दिवसांची वैधता दिली असून यात दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय जिओ यूजर्सना 2GB फ्री डेटा मिळणार आहे.

4/5

Jioचे तीन नवीन प्लान

Jioचे तीन नवीन प्लान

Jio कंपनीने तीन नवीन प्लानही जाहीर केले आहेत. 222 रुपयांचा डेटा अॅड-ऑन पॅक 50GB डेटा ऑफर दिली आहे. तसेच विद्यमान प्रीपेड प्लानपर्यंत वैध असेल. 444 रुपयांच्या Jio प्रीपेड प्लानमध्ये 60 दिवसांच्या वैधतेसह 100GB डेटा समाविष्ट आहे. तर 667 रुपयांचा Jio डेटा अॅड-ऑन पॅक 150GB डेटा ऑफर मिळत आहे. यात 90 दिवसांसाठी वैधता असणार आहे.

5/5

नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान

नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान

Jioकडून दुजोरा देताना सांगण्यात आले की, त्यांचे नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान आज 24 मार्चपासून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजेच आजपासून तुम्ही या योजनांचे रिचार्ज करु शकता.