Jio ची 48 कोटी भारतीयांना गुड न्यूज! इतका स्वस्त रिचार्ज प्लान शोधूनही नाही सापडणार

Pravin Dabholkar | Aug 05, 2024, 08:40 AM IST
1/8

Jio ची 48 कोटी भारतीयांना गुड न्यूज! इतका स्वस्त रिचार्ज प्लान शोधूनही नाही सापडणार

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

Reliance Jio: भारतातील 48 कोटी लोक जिओ सिमकार्डचा वापर करतात. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. काही दिवसांपुर्वीच रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. पण असे देखील काही प्लान आहेत, ज्यामध्ये खूप चांगल्या ऑफर मिळतायत. आज आपण जिओच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतो.

2/8

जिओकडे खूप सारे प्लान्स

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

जिओ आपल्या ग्राहकांची आवडनिवड, गरज आणि बजेटनुसार रिचार्ज प्लान आणत असते. यामध्ये स्वस्त आणि महाग असे दोन्ही प्रकारचे प्लान आहेत. यूजर्स आपली गरज आणि पैशांच्या हिशोबाने प्लान निवडू शकतात. 

3/8

जिओचा 349 रुपयांचा प्लान

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

जिओने आपल्या हिरो प्लानमध्ये 349 रुपयांचा एक चांगला सुरु केलाय. ज्यांना दररोज जास्त डेटा हवाय,त्यांच्यासाठी हा प्लान खूप कामाचा आहे. या प्लानची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर फोन करु शकता. 

4/8

रोज मिळेल 2 जीबी डेटा

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी एकूण 56 जीबी डेटा मिळाले. म्हणजेच रोज 2 जीबी डेटा वापरता येईल.विशेष म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5 जीबी डेटादेखील मिळणार आहे. तुम्ही राहता तिथे 5जी नेटवर्क असेल तर तुम्ही याचा पुरेपूर फायदा करुन घेऊ शकता. 

5/8

ओटीटीचा फायदा

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला आणखी काही फायदे मिळतील. तुम्हाला ओटीटी स्ट्रीमिंगसाठी जिओ सिनेमाची फ्री मेंबरशिप मिळेल. यासोबतच जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचा मोफत वापर करु शकता. 

6/8

319 चा प्लॅन

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

इतर प्लानप्रमाणे 319 चा प्लॅन ठराविक दिवसांसाठी नाहीय. तुम्ही रिचार्ज केल्याच्या दिवसापासून पुढच्या महिन्यात त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत या प्लानची वैधता असते. समजा तुम्ही 5 ऑगस्टला रिचार्ज केल्यास हा प्लान सप्टेंबरपर्यंत चालेल आणि त्यानंतर तुम्हाला 5 सप्टेंबरला पुन्हा रिचार्ज करावे लागेल. यामुळे आपल्याला रिचार्ज केव्हा करायचे हे लक्षात ठेवणे सोपे जाते. पोस्टपेड प्लानमध्ये अशी सुविधा असते पण प्रीपेड प्लानमध्येदेखील जिओ ही सुविधा देतेय.या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB हायस्पीड इंटरनेट मिळेल. एका दिवसात 1.5 GB संपल्यानंतर तुमचा वेग कमी होईल पण तुमचे कनेक्शन तुटणार नाही.

7/8

​​वैधता कॅलेंडर महिन्यानुसार

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

तुम्ही भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित कॉल करू शकता.या प्लानद्वारे तुम्ही दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. जे संपर्कात राहण्यासाठी पुरेसे आहे. या प्लॅनची ​​वैधता कॅलेंडर महिन्यानुसार आहे, म्हणजेच हा प्लॅन रिचार्जच्या तारखेपासून पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत चालतो.

8/8

296 रुपयांचा प्लॅन

Jio affordable plan 349 Monthly Recharge Plan For Indian Users Tech Marathi News

296 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांसाठी 25 जीबी डेटा उपलब्ध होता. 259 रुपयांच्या प्लानची ​​कॅलेंडर महिन्याची वैधता  319 रुपयांच्या प्लानसारखीच होती. हे दोन्ही प्लान आता बंद करण्यात आल्या आहेत.