Jiah Khan मृत्यू प्रकरण : 10 वर्षात नेमकं काय घडलं?

Jiah Khan Suicide Case : दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री जिया खाननं 2013  साली जुहूतील तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. जिया खाननं आत्महत्या केल्याच्या काही दिवसांनंतर अभिनेता सूरज पांचोलीला अटक करण्यात आली. सूरज पांचोली हा लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा मुलगा आहे. सूरज पांचोलीला अटक करण्याचे कारण हे जियाचे मिळालेले पत्र होते. तिनं लिहिलेल्या पत्रात अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्या पत्रात तिनं गर्भपात केल्याचा देखील खुलासा केला होता. त्या प्रकरणात आज शुक्रवारी सुनावनी करण्यात आली. ही सुनावनी सीबीआईचं स्पेशल कोर्टमध्ये निर्णय घेण्यात आला होता. 

| Apr 28, 2023, 14:58 PM IST
1/7

जियाच्या मृत्यूला 10 वर्षे झाली आहेत.

Jiah Khan suicide case complete timeline

जियाच्या निधनाला आता तब्बल 10 वर्षे झाली आहेत. आज सकाळी 10 वाजता सुनावणी सुरु झाली होती. स्पेशल कोर्टचे न्यायमूर्ती एएस सैय्यद यांनी आधी दोन्ही पक्षाची बाजू ऐकली आणि निर्णय घेतला आहे. 

2/7

सूरज पांचोलीची निर्दोष

Jiah Khan suicide case complete timeline

मुंबईतील सीबीआय कोर्टात आज न्यायालयानं जिया खान आत्महत्या प्रकरणावर निर्णय दिला आहे. तर या प्रकरणात कोर्टानं सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. 

3/7

मुंबईतील घरात केली आत्महत्या

Jiah Khan suicide case complete timeline

3 जून 2013 : जियानं मुंबईत तिच्या राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. 7 जून 2013 : रोजी जियाच्या बहिणीला जियानं लिहिलेलं पत्र मिळालं होतं.   

4/7

सूरज पांचोलीला अटक

Jiah Khan suicide case complete timeline

11 जून 2013 : जियानं आत्महत्या केल्याच्या काही दिवसांनंतर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेचे कारण हे जियानं लिहिलेलं 6 पानांची सुसाईड नोट होती. तर जियाचं शवविच्छेदन केल्यानंतर बातमी समोर आली की तिच्या मृत्यूचे कारण हे फासावर लटकवणे आहे. जुलै 2014 : या सगळ्या प्रकरणात सीबीआयकडे चौकशीची मागणी केली होती. 

5/7

मृत्यूआधी जिया होती प्रेग्नंट?

Jiah Khan suicide case complete timeline

डिसेंबर 2015 : मृत्यूआधी जिया होती प्रेग्नंट? 30 जानेवारी 2020 : सूरज पांचोलीविरोधात आरोप निश्चित  

6/7

2021 साली सीबीआय स्पेशल कोर्टात प्रकरण दाखल

Jiah Khan suicide case complete timeline

2021 साली सीबीआय स्पेशल कोर्टात प्रकरण दाखल झाल्यानंतर 2022 साली नव्यानं चौकशी करण्याची मागणी कोर्टानं फेटाळली होती. 

7/7

सूरज पांचोलीच्या बाजून निर्णय

Jiah Khan suicide case complete timeline

28 एप्रिल 2023 म्हणजे आज सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.