Jeshtha Gauri Avahan Wishes : सोनपावलांनी गौरी आली घरी...ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Jeshtha Gauri Pujan Wishes in Marathi : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन सोनपावलांनी होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा आणि मंगलदिन साजरा करा. 

Sep 10, 2024, 07:45 AM IST
1/7

आली आली गौराई  सोन पावलांच्या रुपाने आली आली गौराई धनधान्यांच्या रूपाने  गौरी आवाहनाच्या शुभेच्छा   

2/7

सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई, पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई! गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना! ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/7

सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी, उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली! ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4/7

सोन्याच्या पावली गौराई घरी आली, आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली! ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/7

गौरी-गणपतीच्या आगमानसाठी सजली संपूर्ण धरणी, सोन्याच्या पावलांनी गौरी येऊ दे आपल्या घरी, लाभो आपणास सुख-समृद्धी होवो आपली प्रगती ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/7

लेकी-सुनांची माय माऊली देईल मायेची सावली, आली गौराई माहेराला, भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला करा तिची मनोभावे सेवा ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

7/7

सोन्याच्या पावलाने येणारी  श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना  उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवो गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!