New York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'

IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.

| Jun 07, 2024, 14:51 PM IST
1/7

रोहित आणि ऋषभ जखमी

अनपेक्षितरित्या बॉल काही ठिकाणी उसळी घेत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जखमी देखील झाले होते.

2/7

आयसीसीवर टीका

अशातच आता अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.

3/7

माझी तक्रार नाही

पीच कंडिशनमुळे जर गोलंदाजांना मदत होत असेल, तर माझी कोणतीही तक्रार नाही, असं वक्तव्य जसप्रीत बुमराहने केलंय.

4/7

मला फायदा झाला

टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते, माझ्या रणनीतीवर ठाम राहिल्याने मला फायदा झाला, असंही बुमराहने म्हटलं आहे.

5/7

मी खूश

या परिस्थितीत ठोस तयारी करणं महत्त्वाचं आहे आणि मी कामगिरीवर खूश असल्याचं वक्तव्य जसप्रीत बुमराहने केलं आहे.

6/7

सहा धावा देऊन 2 विकेट्स

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने तीन ओव्हरमध्ये सहा धावा देऊन 2 विकेट्स घेतले होते. तर हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले होते.

7/7

गोलंदाजांना फायदा?

दरम्यान, पहिल्या सामन्यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना फायदा होणार का? असा सवाल विचारला जात आहे.