'मला सोडून जाऊ नका,' न्यासा आणि जान्हवीचा खास मित्र ओरीची पोस्ट; चर्चा दोघींच्या कमेंटची

Orry Instagram Post: अजय देवगणची (Ajay Devgn) मुलगी न्यासा (Nyasa) आणि जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) खास मित्र असणाऱ्या ओरहान उर्फ ओरीने (Orry) इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपले लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, त्याने दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली आहे.  

Jul 04, 2023, 17:39 PM IST
1/10

न्यासा देवगण (Nysa Devgn) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी आपला मित्र ओरहान उर्फ ओरीच्या Instagram पोस्टवर कमेंट केली आहे. ओरीची या दोघींशीही खास मैत्री आहे.   

2/10

अजय देवगणची मुलगी न्यासा आणि जान्हवी कपूरचा खास मित्र असणाऱ्या ओरहान उर्फ ओरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपले लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत त्याचे मित्रही सोबत दिसत आहेत.   

3/10

ओरहान उर्फ ओरी हा बॉलिवूडच्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे.   

4/10

ओरहान उर्फ ओरी हा बॉलिवूड स्टारकिड्समुळेच प्रसिद्ध झाला आहे. अनेक पार्ट्यांमध्ये तो त्यांच्यासह दिसत असतो. त्यातही खासकरुन न्यासा आणि जान्हवी यांचा तो फार जवळचा मित्र आहे.   

5/10

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'मला सोडून जाऊ नको, बेबी मी प्रयत्न करत आहे', अशी कॅप्शन त्याने फोटोंना दिली आहे.   

6/10

पहिल्या फोटोत ओरीने एक सेल्फी शेअर केलेला दिसत आहे. यामध्ये एक मुलगीही आहे, पण तिचा चेहरा दिसत नाही.   

7/10

दरम्यान दुसऱ्या फोटोत ओरीसह न्यासा उभी असल्याचं दिसत आहे.   

8/10

ओरीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या अनेक मित्र आणि फॉलोअर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. कमेंट करणाऱ्यांमध्ये जान्हवी कपूरचाही समावेश आहे.   

9/10

जान्हवीने कमेंट करताना लिहिलं आहे की, "Gtg sorry". तर न्यासाने 'कोण तुला सोडून जाईल' अशी कमेंट केली आहे.   

10/10

त्याच्या इतर मित्रांनीही कमेंट केल्या आहेत. लिसा हेडनची बहीण, ज्युलिया हेडनने लिहिले की.  "म्युझियमने नुकताच फोन केला, त्यांना तुला ठेवायचं आहे." खुशी कपूर आणि अलाविया जाफरी यांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट केली.