इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये 5 भारतीय, बॉलिवूडमधील 'या' 3 कलाकारांचा समावेश

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये 5 भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील या 3 कलाकारांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते कलाकार? जाणून घ्या सविस्तर 

| Dec 29, 2024, 16:50 PM IST
1/7

सोशल मीडिया

सध्या सोशल मीडियाचे युग आहे. ज्यामध्ये सोशल मीडियावर जो प्रसिद्ध आहे, तो सर्वात जास्त यशस्वी असल्याचं म्हटले जाते. 

2/7

सर्वात जास्त फॉलोअर्स

अशाच परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला आज पाच भारतीय लोकांची नावे सांगणार आहोत, ज्यांचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत.   

3/7

आलिया भट्ट

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या भारतीय लोकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे नाव आहे. जिचे इन्स्टाग्रामवर 86.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

4/7

नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर 92.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

5/7

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर 92.5 मिलियन फॉलोअर्स आहे.   

6/7

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे इन्स्टाग्रामवर 94.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच ती 'स्त्री 2' चित्रपटात दिसली होती.  

7/7

विराट कोहली

तर या यादीत सर्वात पहिले नाव भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे आहे. ज्याचे इन्स्टाग्रामवर 270 मिलियन फॉलोअर्स आहेत.