Bageshwar Dham: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा 4 जुलै रोजी वाढदिवस असतो. ते 27 वर्षांचा झाले आहेत. अनेकदा चर्चेत राहणारे धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या आश्रमात लोकांची नेहमीच वर्दळ असते. त्यांना भेटण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटीदेखील येत असाता. 

| Jul 04, 2023, 16:54 PM IST

Dhirendra krishna Shastri:बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा 4 जुलै रोजी वाढदिवस असतो. ते 27 वर्षांचा झाले आहेत. अनेकदा चर्चेत राहणारे धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या आश्रमात लोकांची नेहमीच वर्दळ असते. त्यांना भेटण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटीदेखील येत असाता. 

1/9

Bageshwar Dham: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

2/9

Bageshwar Dham: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

मध्य प्रदेशातील छतरपूर येथे जन्मलेले कथाकार धीरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कधी ते त्याच्या विधानांनी तर कधी कथांमुळे चर्चेचा विषय बनतात. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो लोक पोहोचतात, ज्याला त्यांनी 'दिव्य दरबार' असे नाव दिले आहे.

3/9

'दिव्य दरबारात' लोकांचे अर्ज

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

या 'दिव्य दरबारात' लोक अर्ज करतात. ज्यांच्या अर्जाची चिठ्ठी येते त्यांना धीरेंद्र शास्त्रींच्या मंचावर जाण्याची संधी मिळते. चिठ्ठी  न उघडता समोरच्या व्यक्तीची समस्या सांगण्याचा दावा ते करतात.

4/9

समस्येवर उपाय

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

एवढेच नव्हे तर धीरेंद्र शास्त्री हे समस्येवर उपाय देखील देतात. या शैलीमुळे धीरेंद्र शास्त्री यांची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. त्यांच्या दरबारात नेत्यांपासून ते बड्या हस्ती हजेरी लावतात.

5/9

दाव्यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

मात्र, त्यांच्या या दाव्यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेकवेळा ते वादातही अडकले आहेत. असे असतानाही त्यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता परदेशातही त्यांच्या कथांचे आयोजन केले जात आहे.

6/9

हिंदू राष्ट्रा'ची मागणी

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

देशाला 'हिंदू राष्ट्र' म्हणून घोषित करण्याची मागणी धीरेंद्र शास्त्री सातत्याने करत आहेत. समान नागरी कायद्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचे त्यांनी समर्थन केले आहे.

7/9

Y दर्जाची सुरक्षा

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

काही काळापूर्वी त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सरकारी सुरक्षेसोबतच खासगी बाऊन्सरही त्यांच्यासोबत असतात.तसेच त्यांच्या पुढे आणि मागे वाहनांचा मोठा ताफा असतो.

8/9

दरवर्षी मोफत सामूहिक विवाह

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

धीरेंद्र शास्त्री यांच्याहस्ते दरवर्षी मोफत सामूहिक विवाहही आयोजित केले जातात. या दरम्यान मुलीला घरातील सर्व सामान दिले जाते.

9/9

चष्मा घालून भक्तांना आशीर्वाद

Bageshwar Dham intresting Things About Dhirendra krishna Shastri

गेल्यावर्षीच्या गुरुपौर्णिमेचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होता. यामध्ये ते काळा चष्मा घालून भक्तांना आशीर्वाद देताना दिसतात. यादरम्यान धीरेंद्र शास्त्री हसत हसत लोकांशी बोलताना दिसले.