जैन भिक्षु आणि नन्स कधीच करत नाहीत आंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?

Jain Monk Lifestyle : जैन धर्माचे साधू, साध्वी आणि नन्स यांचं आयुष्य अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध असतं. दीक्षा घेतल्यानंतर ही लोक कधीही आंघोळ करत नाही. तरीदेखील तुम्ही ती कायम स्वच्छ आणि ताजीतवानी कशी दिसतात असा प्रश्न पडला असेल ना?

नेहा चौधरी | May 01, 2024, 15:55 PM IST
1/7

जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर दोन्ही पंथ असून उन्हाळा असो किंवा हिवाळी ही लोक जमिनीवर झोपतात. भौतिक सुखाचा त्याग करुन कठोर जीवन जगतात.   

2/7

जैन साध्वी असो किंवा नन्स हे दीक्षा घेतल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करतात आणि त्या दिवसापासून ते कधीच आंघोळ करत नाहीत. 

3/7

या लोकांचा असा विश्वास आहे की, आंघोळीमुळे शरीरातील सूक्ष्म जीवांचं जीवन नष्ट होतं. 

4/7

तुम्हाला आश्चर्य वाटेल की जैन पंथातील साध्वी पुरुष हे कपडे घालत नाही. तर महिला पांढऱ्या साडी परिधान करतात.  

5/7

वर्षांनुवर्ष आंघोळ न करताही ही लोक इतकी फ्रेश आणि स्वच्छ कशी वाटतात. याबद्दल  ते सांगतात की. आंघोळीचे दोन प्रकार असून एक बाह्य आणि अंतर्गत स्वच्छता. सामान्य लोक पाण्याने आंघोळ करतात. ही लोक अंतर्गत स्वच्छतेवर भर देतात. त्यासाठी ते ध्यान, मन आणि विचार यांची शुद्धता करतात. 

6/7

ही लोक थोड्या थोड्या दिवसांनी ओल्या कापडाने आपलं शरीर पुसून घेतात आणि बाह्य शरीर स्वच्छ करतात. 

7/7

जैन धर्मात पाण्याला मौल्यवान स्त्रोत मानले गेले असल्याने ते त्याचा आंघोळ करु दुरुपयोग करत नाहीत. त्याशिवाय स्नान करणे हे इंद्रिय सुख मानलं जातं म्हणून ती लोक आंघोळीचा त्याग करतात.