ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतं

पृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय. 

| Jul 06, 2024, 20:26 PM IST

Asteroid Approaching Earth:  एक भयानक संटक 30204 KM प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अतराळात निरीक्षण करणाऱ्या नासाच्या उपग्रहाने संकट शोधले आहे. आधीच याबात अलर्ट करण्यात आले आहे. 

1/7

10 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळून एक महाभयानक संकट जाणार आहे. यामुळे जगभरातील संशोधक अलर्ट झाले आहेत.  

2/7

 2024 ME1 हा अमोर समूहातील लघुग्रह आहे. अशा प्रकारचे लघुग्रहांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एकमेकांच्या जवळ असली तरी ते त्यांना ओलांडत नाहीत. असे लघुग्रह सहसा पृथ्वीच्या मार्गापासून दूर सूर्याभोवती फिरतात. अशा स्थितीत जेव्हा ते पृथ्वीच्या जवळून जातात तेव्हा पृथ्वीला प्रत्यक्षात फारसा काही धोका नसतो. 

3/7

2024 ME1 या लघुग्रहाचा वेग आणि त्याचा आकार यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे. मात्र, या लघुग्रहामुळे सध्या तरी पृथ्वीला कोणता धोका नाही.  यामागचे कारण देखील संशोधकांनी सांगितले आहे. 

4/7

 10 जुलै 2024 रोजी 2024 ME1 हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. यानंतर 9 डिसेंबर 2027 रोजी हा लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळून जाईल. 

5/7

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) द्वारे लघुग्रहाचे निरीक्षण केले जात आहे. जेपीएलच्या वॉच डॅशबोर्डवर लघुग्रहाची स्थिती, वेग आणि पृथ्वीपासूनचे अंतर यावर रिअल-टाइम डेटा उपलब्ध होत आहे. 

6/7

2024 ME1 हा लघुग्रह 30204 KM प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या लघुग्रहाचा आकार 6 मजली इमारती इतका मोठा आहे.  

7/7

पृथ्वीवर येणारे संकट म्हणजे लघुग्रह आहे. 2024 ME1 असे या लघुग्रहाचे नाव आहे.