भन्नाट! सूर्याच्या जवळ जात Aditya L1 नं टिपली अद्भूत दृश्य

ISRO Aditya L1 Spacecraft Mission : इस्रोनं सोशल मीडियाचा आधार घेत सूर्यावरील काही अद्वितीय दृश्य जगासमोर आणली आहेत.   

Jun 11, 2024, 10:49 AM IST

ISRO Aditya L1 Spacecraft Mission : 'चांद्रयान 3' ला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली आणि या मोहिमेत आता इस्रोला मोठं यश मिळालं आहे. 

1/8

सूर्याच्या हालचाली

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

ISRO Aditya L1 Spacecraft Mission : सूर्याच्या हालचाली आणि इतर गोष्टींसंदर्भातील निरीक्षणाच्या हेतूनं अंतराळात पाठवण्यात आलेल्या आदित्य एल1 यानानं भारावणारी छाया टीपली आहे. 

2/8

सौरवादळ

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

इस्रोनं नुकत्याच प्रदर्शित केलेल्या छायाचित्रांमध्ये सौरवादळाची विविध रुपं स्पष्टपणे पाहता येत आहेत. 

3/8

सेन्सर लेन्स

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

अनेक सेन्सर असणाऱ्या लेन्सच्या माध्यमातून आदित्य एल1 नं सूर्याच्या या छाया टीपल्या.   

4/8

लॅग्रान्ज पॉईंट

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

इस्रोच्या माहितीनुसार पृथ्वीपासून दीड कोटी किलोमीटर अंतरावर आदित्य एल1 लॅग्रान्ज पॉईंट इथं स्थिरावलं असून, त्याच ठिकाणहून ते सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.   

5/8

इस्रो

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

याच यानाच्या माध्यमातून मे महिन्यात टीपण्याल आलेले सौरवादळाचे फोटो शेअर करत त्या फोटोंसंदर्भातील माहिती इस्रोनं दिली आहे. 

6/8

व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

इस्रोच्या माहितीनुसार सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंक टेलिस्कोपच्या माध्यमातून व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफचा वापर करत सूर्यावरील ही दृश्य टीपण्यात आली.   

7/8

सनस्पॉट

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

आदित्य एल1 नं टीपलेल्या या फोटोंमध्ये सूर्यावरील सनस्पॉट दिसत असून सूर्यावर चुंबकीय बदलांमुळं सौर वादळं आल्याचं सांगत या वादळांचा पृथ्वीवरही परिणाम दिसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

8/8

सूर्यावरील वादळ

ISRO Aditya L1 Spacecraft captured sun solar flares see photos

8 ते 15 मे दरम्यानच्या काळात सूर्यावर सौरवादळं आल्याचं सांगत 11 मे रोजी आलेलं वादळ मोठं असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.