घटस्फोटानंतर 9 महिन्यांनी कुशा कपिला 'या' स्टॅण्डअप कॉमेडियनला करतेय डेट? 'त्या' पोस्टमुळे चर्चा

Kusha Kapila Dating: सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेली ही सोशल मीडिया इन्फ्युएन्सर 9 ते 10 महिन्यांपूर्वी तिने अचानक जाहीर केलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. मात्र आता ती एका स्टॅण्डअप कॉमेडीयनबरोबरच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा स्टॅम्डअप कॉमेडीयन आणि नेमकी काय चर्चा सुरु आहे याबद्दल...

Swapnil Ghangale | Apr 19, 2024, 09:23 AM IST
1/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

सोशल मीडिया इन्फ्युएन्झर कुशा कपिला ही एका प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडीयन डेट करत असल्याची चर्चा आहे.  

2/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

'रेडइट' या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे कुशा कपिलाच्या अफेरची चर्चा सुरु झाली आहे.

3/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

विशेष म्हणजे कुशा कपिला या स्टॅम्डअप कॉमेडियनबरोबर गोव्याला पिकनिकला गेल्याचा दावाही केला जात आहे. 

4/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

आता कुशा कपिला कोणाबरोबर रिलेशनमध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, अनुभव सिंग बस्सी!  

5/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

'फार जवळच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत,' अशा कॅप्शनसहीत रेडइटवर कुशा कपिला आणि अनुभव सिंग बस्सीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.  

6/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी आणि कुशा कपिला या दोघांमधील गोवा ट्रीमधील जवळीक अनेकांच्या नजरेत भरल्याचं सांगितलं जात आहे.   

7/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

अनुभव सिंग बस्सी हा बस्सी या नावाने लोकप्रिय असून त्याचे स्टॅण्डप कॉमेडीचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. इन्स्टाग्रामवर त्याचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर त्याच्या चॅनेलला 5 मिलियन लोक फॉलो करतात.  

8/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

मागील वर्षी अनुभव सिंग बस्सीने 'तू झूटी मैं मक्कार' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तो रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरबरोबर झळकला होता.  

9/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

दुसरीकडे कुशा कपिलाने झोरावर आहलुवालियापासून घटस्फोट घेतला आहे. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं. मात्र जून 2023 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली.  

10/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

कुशा आणि झोरावरने एक संयुक्त पत्रक जाही करुन, "आम्ही सर्व प्रयत्न केले. मात्र यापुढे ते शक्य दिसत नाही," अशा अर्धाची पोस्ट करत "हे नातं संपवावं लागत असल्याचं फार खेदजनक आहे," असं म्हटलं होतं. तसेच यामधून सावरण्यासाठी वेळ लागेल असंही दोघांनी म्हटलं होतं.

11/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटामध्ये झळकलेल्या कुशाने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाची बातमी सार्वजनिक करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असं म्हटलं आहे. "माझ्या खासगी आयुष्यातील बातमी शेअर करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मी पहिल्यांदाच हा खुलासा करत आहे. मात्र 100 टक्के माझ्यावर दबाव टाकण्यात आला. पण मी ती बातमी स्वत:च्या अटी-शर्थींनुसारच शेअर केली," असं कपिला म्हणाली होती.

12/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

"माझ्याशी चर्चा न करता माझ्या आयुष्याबद्दल इतर कोणी जगाला सांगावं असं मला वाटतं नाही," असंही कुशाने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.  

13/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

आता घटस्फोटानंतर जवळपास 9 महिन्यांनी कुशा अनुभव सिंग बस्सीला डेट करत असल्याची चर्चा आहे.   

14/14

Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi

मात्र कुशा आणि अनुभव सिंग बस्सी या दोघांपैकी कोणीही एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्या तरी हे दोघे डेट करत असल्याची चर्चा केवळ अफवाच असल्याचं दोघांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.