हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामच्या अफेअर्सच्या चर्चां

Jan 12, 2018, 13:17 PM IST
1/5

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते काही नवीन नाही. या क्षेत्रातील अनेक प्रेमकथा रंगल्या, गाजल्या आणि यशस्वीही झाल्या. तर काहींना थोड्या कालावधीतच पूर्णविराम लागला. अलीकडे सागरिका-झहीर आणि विराट-अनुष्का या क्रिकेट आणि बॉलिवूडमधील जोड्या विवाहबद्ध झाल्या. 

2/5

एली अवराम मुंबईत झालेल्या लग्नात दिसली. लग्नात ती पांड्याच्या कुटुंबियांसोबत चांगलीच रमली होती. तिने बराच वेळ लग्नात घालवला. सोशल मीडियावर एलीचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या.

3/5

या प्रकरणानंतर पुन्हा एकदा क्रिकेट आणि बॉलिवूडच कनेक्शनवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हार्दिकचा भाऊ कृणालच्या लग्नातील सर्व विधींना ही एली अवराम उपस्थित होती. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

4/5

 काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्याच्या चर्चांना उधाण आले होते. परिणीतीच्या ट्वीटला काही खास शैलीत उत्तर दिल्याने या चर्चांना सुरूवात झाली होती. (फोटो-इन्स्टाग्राम)

5/5

 हार्दिक पांड्याचे नाव बिग बॉसमधून प्रसिद्धी झालेली अभिनेत्री एली अवराम सोबत जोडले गेले आहे. या अफेयरच्या चर्चांना क्रुणालच्या लग्नापासून उधाण आले आहे.