Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?

भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे. 

| Oct 31, 2023, 18:04 PM IST

Indian Railway: भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे. 

 

1/7

Premium Tatkal

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

Premium Tatkal: ट्रेनचा प्रवास हा आरामदायी आणि सुरक्षित मानला जातो. पण रेल्वेची तिकिट बुक करणे हे मात्र त्रासदायक ठरते. एक तर साध्या पद्धतीने तिकिट बुक करण्यात येते व दुसरी पद्धत म्हणजे तात्काळमध्ये तिकिट बुक करता येते. मात्र, तात्काळप्रमाणेच एक प्रीमियम तात्काळ बुकिंग पर्यायाबद्दल फार कमी जणांना ठावूक आहे. 

2/7

नवा पर्याय

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

भारतीय रेल्वेने तात्काळ व्यतिरिक्त आणखी एक नवीन कोटा सुरू केला आहे. पण तात्काळ सुविधेपेक्षा थोडा वेगळा आहे. प्रीमीयम तात्काळ कोटामध्येही तात्काळप्रमाणेच बुकिंग करण्यात येते आणि बुकिंगही प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. 

3/7

बुकिंग कधी करता येऊ शकते

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

एसी क्लासच्या तिकिटसाठी 10 वाजल्यापासून बुकिंग सुरू होते. मात्र, नॉन एसी क्सालसाठी तिकिटांसाठी 11 वाजल्यानंतर बुकिंग सुरू होते. विशेष म्हणजे यात तिकिटाचे डायनेमिक दर असतात म्हणजेच तिकिटाचे भाडे सतत बदलत असते. यात तिकिटाचे भाडे ते तात्काळ तिकिट बुकिंगपेक्षाही जास्त असू शकते. 

4/7

तात्काळ आणि प्रिमीयम तात्काळ

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

तात्काळ आणि प्रिमीयम तात्काळ यात फरक काय, असा सवाल उपस्थित होतो. तात्काळ तिकिटात तिकिटांची किंमत स्थिर असते आणि किलोमीटर आणि क्लासयावरुन तिकिटाची रक्कम फिक्स होते. 

5/7

तिकिटाचे दर

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

 प्रिमियम तात्काळमध्ये कॅटेगरीमध्ये तिकिटाचे दर बदलत राहतात. यात तिकिटांची मागणी असेल तर तेव्हा पैसेही जास्त मोजावे लागतात. 

6/7

आयआरसीटीसी

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

 प्रिमियम तात्काळ तिकिट हे आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून बुक केले जाते. पण तात्काळ तिकिट हे आयआरसीटीसीच्या व्यतिरिक्त अन्य वेबसाइटवरही बुक केले जाते. 

7/7

अधिकृत वेबसाइट

IRCTC Premium Tatkal Ticket Booking information in marathi

प्रिमियम तात्काळमध्ये तिकिट बुक करण्यासाठी अधिक कालावधी मिळतो. मात्र तात्काळमध्ये अगदी थोड्याचवेळात तिकिट संपतात. पण प्रिमियममध्ये तिकिट बुक करण्यासाठी जास्त कालावधी मिळतो मात्र फक्त अधिकृत वेबसाइटवरुनच तिकिट बुक केले जातात.