IPL 2025 : पंजाब किंग्ससाठी प्रिती झिंटा उघडणार पेटारा, या जुन्या मित्राला करणार संघाचा हेड कोच

Punjab Kings in IPL 2025 : गेल्या 17 वर्षात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. नाव बदललं तरी देखील पंजाबचं नशिब काही बदललं नाही. अशातच आता पंजाबची मालकिन प्रिती झिंटाने (Priti zinta) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

Saurabh Talekar | Jul 24, 2024, 16:14 PM IST
1/5

पंजाब किंग्ज

आयपीएल 2025 च्या आधी पंजाब किंग्ज भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टच्या हवाल्याने समोर आली आहे.

2/5

ट्रेव्हर बेलिस

पंजाब किंग्ज ट्रेव्हर बेलिस यांच्यासोबत आगामी आयपीएल 2025 साठी करार करण्यास इच्छुक नाही, अशी माहिती देखील समोर नाही.

3/5

युवराज सिंग

पंजाब किंग्ज आता नव्या हेड कोचच्या शोधात आहे. अशातच आता प्रिती झिंटा जुना मित्र आणि खेळाडू युवराज सिंग याला प्रशिक्षक म्हणून घेण्यास इच्छूक आहे.

4/5

विरेंद्र सेहवाग

युवराज सिंग शिवाय माजी सहकारी खेळाडू विरेंद्र सेहवाग याच्या नावावर देखील चर्चा सुरू आहे. सेहवाग पंजाबचा कोच देखील राहिला आहे.

5/5

सुरेश रैना

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर देखील फँचायझी विचार करत आहे, अशी माहिती देखील क्रिकबझने दिली आहे.