SRH vs MI: हार्दिकची एक चूक आणि...; पंड्याच्या 'या' निर्णयामुळे मुंबईवर ओढावली पराभवाची नामुष्की

IPL 2024 SRH vs MI: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसला नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.

Surabhi Jagdish | Mar 28, 2024, 11:31 AM IST
1/7

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.

2/7

हार्दिक पांड्याने केलेल्या चुकीची किंमत मुंबई इंडियन्सला सामना गमावून चुकवावी लागली. 

3/7

हार्दिकने जसप्रीत बुमराहला केवळ चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. या ओव्हरमध्ये बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. 

4/7

दरम्यान असं असतानाही हार्दिकने बुमराहला 12 व्या ओव्हरपर्यंत गोलंदाजी दिली नाही.

5/7

13व्या ओव्हरपासून जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी आणलं. या सामन्यात तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. 

6/7

बुमराहने 9 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 36 रन्स दिले.

7/7

बुमराह सोडून इतर सर्व गोलंदाजांची इकोनॉमी 11 पेक्षा जास्त होती. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं.