IPL 2023 Photos: ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आयपीएलचा थरार, पाहा काय असणार यावेळी खास

IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेनंतर (India vs Australia Test Series) एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना 22 मार्चला खेळवला जाणार आहे. तर आयपीएलच्या हंगामाला (IPL 2023) 31मार्चपासून सुरुवात होणार आहे. म्हणजे दोन्ही संघाच्या खेळाडूंना 8 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स  (Chennai Super Kings) दरम्यान खेळवला जाणार आहे.

Mar 17, 2023, 16:35 PM IST
1/7

जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल ओळखली जाते. यंदाचा आयपीएलचा सोळावा हंगाम असून बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मार्चला स्पर्धेला सुरुवात होईल तर 28 मेला आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 

2/7

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघांची एन्ट्री झाली. गुजरात टायटन्स आणि लखनऊ जाएंट्स या संघांच्या समावेशामुळे आयपीएलमध्ये एकूण दहा संघ झाले. विशेष म्हणजे या दोन्ही नव्या संघांनी पहिल्याच स्पर्धेत दमदार कामगिरी केली

3/7

हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सदरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला होता. यात आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने राजस्थानचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.

4/7

कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धा संपूर्ण देशात खेळवण्यात आली नव्हती. पण यंदा आधीच्याच फॉर्मेटप्रमाणे स्पर्धा रंगेल. म्हणजे प्रत्येक संघ एक सामना घरच्या मैदानावर आणि एक सामना विरोधी संघाच्या होम ग्राऊंडवर खेळेल.

5/7

आयपीएलमध्ये यंदा डिजिटल आणि टीव्ही राईट्स वेगवेगळे देण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार झाला आहे. जिओच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. तर टीव्ही सामने तुम्हाला स्टार स्पोर्ट्सवर पाहाता येणार आहेत.

6/7

याशिवाय जिओने आयपीएल स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार तब्बल 12 स्थानिक भाषांमध्ये (Regional Language) आयपीएलचे सामने पाहाता येणार आहेत.

7/7

IPL 2023 प्रेक्षकांसाठी आणखी खास असणार आहे. कारण यंदा स्पर्धेदरम्यान क्वीजचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशिवाय काही बॉलिवूड स्टार्सची (Bollywood Stars)  बोलणं सुरु आहे.