IPL 2023 Photos: आयपीएलमधल्या 'या' मिस्ट्री गर्ल आठवतात का? कॅमेराची नजर पडली आणि देशभरात झाल्या व्हायरल

IPL 2023 Photos: आयपीएलमध्ये खेळले जाणारे सामने जितके चुरशीचे आणि रंगतदार असतात तितकेच चाहत्यांची (Fans) रिअॅक्शनही बघण्या सारख्या असतात. सामने सुरु असताना अनेकवेळा कॅमेरा प्रेक्षकांच्या गर्दीत फिरतो आणि फॅन्सच्या काही मजेदार रिअॅक्शन टिपल्या जातात. काही वेळा एखाद्या सुंदर चेहऱ्यावर (Beautiful Fans) कॅमेरा रोखला जातो आणि सगळ्यांच्या नजरा त्या चेहऱ्यावर खिळतात. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात अशाच काही मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) रातोरात लोकप्रिय झाल्या आहेत. आयपीएलच्या नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशाच काही आठवणीतल्या मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेणार आहोत.

Mar 27, 2023, 14:23 PM IST
1/5

काव्या मारन

आयपीएलच्या मिस्ट्री गर्लमध्ये पहिला क्रमांक लागतो सनरायजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारनचा (Kaviya Maran). आयपीएलच्या एका हंगामात पॅव्हिलिअनमध्ये बसून संघाला चिअर करणाऱ्या काव्या मारनवर कॅमेराची नजर पडली आणि रातोरात ती स्टार झाली. तिच्या सौंदर्यामुळे तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. काव्या आयपीएल ऑक्शनमध्येही दिसली होती.

2/5

आरती बेदी

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्याचा एक सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला होता. या सामन्यात केकेआरच्या कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या होत्या. कुलदीपने चौथी विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष केला, यावेळी मैदानातील कॅमेरामनची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आरती बेदीवर (AARTI BEDI) पडली आणि तिच्यावर कॅमेरा रोखला गेला. त्यानंतर कुलदीपच्या कामगिरीबरोबरच आरती बेदीचीही चर्चा रंगली होती. आरती ही एक व्यावसायिक डान्सर आहे.

3/5

दीपिका घोष

मिस्ट्री गर्लच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे ती दीपिका घोष (DEEPIKA GHOSH). आयपीएल 2019 दरम्यान एका सामन्यात आपला फेव्हरेट संघ आरसीबीला सपोर्ट करताना कॅमेराची नजर दीपिका घोषवर पडली. लाल रंगाचा हॉट ड्रेस आणि आरसीबीला चिअर करण्याचा अंदाज कॅमेरामनला  चांगलाच आवडला होता. यानंतर दीपिका घोष मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली. 

4/5

मालती चहर

आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या एका सामन्यादरम्यान पहिल्यांदा मालती चहर (MALTI CHAHAR) दिसली होती. प्रेक्षकात बसलेल्या मालतीला कॅमेराने टीपलं आणि मालती रातोरात मिस्ट्री गर्ल बनली. तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. खरतर मालती ही चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहिण आहे. चेन्नईला चिअर करण्यासाठी मालती आली होती आणि ती एमएस धोणीची मोठी फॅन आहे.

5/5

आदिती हुडिया

मिस्ट्री गर्लच्या यादीत पाचव्या मुलीचं नाव आहे ते आदिती हुडियाचं (ADITI HUNDIA). आदिती मुंबई इंडियन्सची जबरा फॅन आहहे. आयपीएल 2019 ची अंतिम फेरी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान खेळली गेली होती. या समन्यात आदिती हुडिया मुंबई इंडियन्सला चिअर करताना दिसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती ही क्रिकेटपटू इशान किशनची गर्लफ्रेंड होती.