IPL 2023 : विजयानंतर 'या' खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, चेन्नईच्या यशात महत्त्वाची भूमिका

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम आता पार पडला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अफलातून खेळीच्या जोरावर चेन्नईने गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans) मात केली. पण या विजयानंतर चेन्नईच्या एका खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नईच्या विजयात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 

राजीव कासले | May 30, 2023, 22:44 PM IST
1/5

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंबाती रायडूने (Ambati Rayudu) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अंतिम सामन्यापूर्वीच रायडूने निवृत्तीबदद्ल सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

2/5

गुजरातविरुद्धच्या अंतिम सामन्यात रायडूने 8 चेंडूत 19 धावा करत चेन्नईच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.  चेन्नईच्या विजयानंतर कर्णधार धोनीने आयपीएल ट्रॉफी सर्वात आधी अंबाती रायडूच्या हाती सोपवली. विजयानंतर रायडू प्रचंड भावूक झाला होता. 'हे सर्व अविश्वनीय आहे, मी खूप भाग्यशाली आहे, कारण मी या महान संघाबरोबर खेळलो' असे उद्गार रायडूने काढले आहेत.

3/5

आयपीएल इतिहासात अंबाती रायडूने तब्बल सहावेळा विजयाची ट्रॉफी उंचावली आहे. चेन्नईबरोबरच रायडू मुंबई इंडियन्स संघातून खेळला आहे. रायडूने 203 आयपीएल सामन्यात 4328 धावा केल्या आहेत.  यात एक शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. 

4/5

स्थानिक क्रिकेटमध्येही अंबाती रायडूची कामगिरी दमदार राहिली आहे. त्याने 97 प्रथम श्रेणी सामन्यात 6151 धावा केल्या आहेत. यात 16 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 178 लिस्ट ए सामन्यात त्याने 5607 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं आणि 40 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. 

5/5

अंबाती रायडू टीम इंडियासाठी 55 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 1694 धावा केल्या असून 3 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 7 टी20 सामन्यात 61 धावा करता आल्या आहेत.