जून महिन्यात उरकून घ्या 'ही' सहा कामं; नंतर डोक्याला टेन्शन नको!

June 2023: नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झालेत. जून महिन्यात महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील. पाहा आणि तुमच्या कामाच्या यादीत नोंदणीकृत करा.

May 30, 2023, 21:21 PM IST

June 2023: नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झालेत. जून महिन्यात महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील. पाहा आणि तुमच्या कामाच्या यादीत नोंदणीकृत करा.

1/5

पॅन - आधार लिंक करा

सर्वाना पॅन आणि आधार यांची जोडणी करणं आवश्यक करण्यात आलंय. त्याची अंतिम मुदत 30 जून 2023 आहे.

2/5

अमृतकलश योजना पुन्हा सुरू

बँकेत कधी एफडी करायले गेले असाल तर तुम्ही अमृतकलश योजनेविषयी नक्की ऐकलं असेल. सामान्यांसाठी 7.10 टक्के आणि ज्येष्ठांसाठी 7.60  टक्के व्याजदर देणारी ही योजना 400 दिवसांसाठी आहे. याची मुदत 30 जून रोजी संपणार आहे.  ज्येष्ठांसाठी ७.६० टक्के व्याजदर आहे.

3/5

बँक लॉकर कराराचे नूतनीकरण

रिझर्व्ह बँकेने बँक लॉकर करारांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यासाठी बँकांना 30 जून 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. यात 50 टक्के कराराचे नूतनीकरण करायचे आहे.

4/5

ईपीएस पेन्शन

वाढीव ईपीएस पेन्शन मिळण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. आधीच मुदतवाढ केलीये. लवकरात लवकर काम उकरून घ्या.

5/5

आधार कार्ड अपडेट करा

तुमचं आधार कार्ड अजूनही अपडेटेड नसेल तर आत्ताच आधार अपडेट करून घ्या. 15 मार्च ते 14 जून या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे.