Birthday Special: रोहित शर्मा- रितिकाची लवस्टोरी, या ठिकाणी केलं होतं लग्नसाठी प्रपोज

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. त्याच्या उत्तुंग यशामध्ये साथ देणाऱ्या त्याची जोडीदाराबाद्दल आज जाणून घेऊया

Apr 30, 2021, 12:08 PM IST
1/6

कोण आहे रितिका सजदेह?

कोण आहे रितिका सजदेह?

रोहित शर्माला पत्नी रितीकाने ट्वीटरवर फोटो शेअर करत वाढदिवसाचा खास शुभेच्छा दिल्या आहेत. रितिका स्टोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करते. याशिवाय ती टीम इंडियाचे Brand Endorsements आणि कॉन्ट्रॅक्ट पाहण्याचं देखील काम करते. 

2/6

रितिकाचा वाढदिवस

रितिकाचा वाढदिवस

रितिका सजदेहचा जन्म 21 डिसेंबर 1987 रोजी झाला आहे.  

3/6

रितिकाचं कुटुंब

रितिकाचं कुटुंब

रितिकाच्या आईचं नाव टीना तर वडिलांचं नाव बॉबी सजदेह आहे. रितिकाला एक भाऊ आहे. ज्याचं नाव कुणाल आहे. 

4/6

रितीकाला काय आवडतं?

रितीकाला काय आवडतं?

रितिकाला फिरायला खूप आवडतं. तिला चॉकलेट्स देखील खूप आवडतात. रॉबर्ट डोनी जुनियर तिचा आवडता अभिनेता आहे. 

5/6

रोहित आणि रितिकाची भेट

रोहित आणि रितिकाची भेट

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंह आणि रितिका एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. त्या नात्यानं युवराज सिंहने एकदा रोहित शर्माला मस्करीत रितिकापासून दूर राहण्यासाठी देखील धमकावलं होतं अशी चर्चा आहे. त्यावेळी रितिका रोहितची क्रिकेटची मॅनेजर म्हणून काम पाहात होती. दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि 6 वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं.   

6/6

या ठिकाणी केलं होतं प्रपोज

या ठिकाणी केलं होतं प्रपोज

रोहित शर्माने IPL दरम्यान प्रपोज केलं होतं. बोरिवलीतील स्पोर्ट्स ग्राउंडवर रोहितने गुडघ्यावर बसून हातात रिंग घेऊन लग्नासाठी मागणी घातली होती.