Investment Tips: गुंतवणूक करताय! 'हे' पर्याय तुम्हाला उपयुक्त ठरतील

Investment in New Year : अनेक जण नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचाही विचार करत असतात. अशा व्यक्तींनी नेमकी गुंतवणूक कुठे करावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे.  

Dec 19, 2022, 21:31 PM IST

Investment in New Year : नवीन वर्ष जवळ आलं की आपण नवनवीन संकल्प करत असतो. मग त्या नवीन गोष्टी शिकण्याच्या असो, अथवा नवीन गोष्टी करण्याच्या असोत. अनेक जण नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचाही विचार करत असतात. अशा व्यक्तींनी नेमकी गुंतवणूक कुठे करावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे.  

1/5

Investment Tips

गेल्या अनेक वर्षापासून नागरीकांचा गुंतवणूकीकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक गुतंवणूक करतायत. काहींनी गुंतवणूकीची सुरूवात केली आहे, तर काही नागरीक येत्या नवीन वर्षापासून सुरूवात करणार आहेत. अशा नवीन गुंतवणूकदारांसाठी नेमके गुंतवणूकीचे कोणते पर्याय आहेत, हे जाणून घेऊयात. 

2/5

Investment Tips

Share Market : तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटमध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर ती जास्त काळ  ठेवा, तरच फायदा मिळेल.शेअर बाजारात गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली जात आहे, त्याबद्दल नीट जाणून घ्या आणि आगामी काळात कंपनी किती वाढ दाखवू शकते ते पहा.

3/5

Investment Tips

Gold : सोन्यात गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित मानले जाते. त्याच वेळी, सोन्याची किंमत हळूहळू वाढते आणि सोन्यापासून चांगला परतावा मिळतो. सोन्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही पैसे गुंतवत असाल तर सोन्याची नाणी किंवा डिजिटल सोने खरेदी करता येईल.

4/5

Investment Tips

Fixed Deposite : बँकेत मुदत ठेव (FD) ठेवणे हे देखील लोकांचे पसंतीचे गुंतवणुकीचे माध्यम आहे. FD मध्ये जोखीम नाही आहे, मात्र FD जास्त परतावा देऊ शकत नाही. एफडीमध्ये मिळणारा परतावा निश्चित आहे. 

5/5

Investment Tips

आरडी: RD  (रिकरिंग डिपॉझिट) हे देखील गुंतवणुकीचे एक माध्यम आहे. आरडी बँकांमध्ये देखील उघडता येते आणि यामध्ये कोणताही धोका नाही. RD मध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा केली जात असली तरी त्याच रकमेवर व्याज मिळते. आरडीवर मिळणारे व्याजही स्थिर राहते. हे गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम आहे.