Lionel Messi नं वर्ल्डकप ट्रॉफी उचलताना घातलेल्या 'त्या' ड्रेसची चर्चा, जाणून घ्या खासियत

Argentina Won Fifa World Cup 2022: मेस्सीच्या शानदार खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर मेस्सीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ट्रॉफी उचलली. या काळ्या रंगाच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Dec 19, 2022, 13:14 PM IST
1/5

Lionel Messi crowning moment

ट्रॉफी सुपूर्द करण्यापूर्वी मेस्सीला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करण्यात आला. यामुळे अर्जेंटिनाची जर्सी पूर्णपणे लपली गेली. यामुळे काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पण हा ड्रेस घालण्याचं कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

2/5

Lionel Messi crowning moment

काळा ड्रेस कतारच्या अमीर तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला ट्रॉफी सुपूर्द करण्यापूर्वी परिधान केला होता. हा बिश्त उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरीपासून बनवलेला पोशाख आहे. हा ड्रेस अरब देशांमध्ये विशेष प्रसंगी परिधान केला जातो. 

3/5

Lionel Messi crowning moment

अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने याआधी 1978 आणि 1986 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवण्यासाठी 36 वर्षे वाट पाहावी लागली.

4/5

Lionel Messi crowning moment

मेस्सीचा विश्वचषक प्रवास 2006 मध्ये सुरू झाला आणि आता पहिला विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला. अंतिम सामन्यात मेस्सी अर्जेंटिनाच्या विजयाचा हिरो ठरला. मेस्सीने अंतिम फेरीत दोन गोल आणि पेनल्टी शूटआऊटमध्येही गोल केले.

5/5

Lionel Messi crowning moment

मेस्सीचा हा शेवटचा फिफा विश्वचषक असल्याचेही मानले जात आहे. तरीही तो अद्याप राष्ट्रीय संघातून निवृत्त झालेला नाही. तो अर्जेंटिनाकडून खेळत राहील.