9999 रुपयांच्या 'या' फोनमध्ये महागड्या फोनसारखे फीचर्स! 50MP कॅमेरा, AMOLED डिस्प्ले अन्...

Infinix Note 12i हा फोन बुधवारी (25 जानेवारी 2023 रोजी) भारतामध्ये लॉन्च झाला. कंपनीने नोट लाइनअपवर हे नवीन मॉडेल तयार केला आहे. हा एक बजेट फोन आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये दमदार मेमरी आणि प्रोसेसर देण्यात आला आहे. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स...

Jan 27, 2023, 17:16 PM IST
1/5

infinix note 12i budget smartphone launched in india Specifications Features Price

Infinix Note 12i चं एकमेव व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केलं आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असून हा फोन 9 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये फोर्स ब्लॅक आणि मेटावर्स ब्लू हे दोन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. या फोनची विक्री 30 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. ग्राहकांना फ्लिपकार्टवर अॅक्सेस बँकेच्या ट्रानझॅक्शनवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे आहेत पाहूयात...

2/5

infinix note 12i budget smartphone launched in india Specifications Features Price

ड्युएल सिम (नॅनो) सपोर्टवाला हा स्मार्टफोन अॅण्ड्रॉइड 12 बेस कंपनीच्या XOS 12.0 कस्टम स्किनवर चालतो. या फोनमध्ये 4GB रॅमबरोबरच MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

3/5

infinix note 12i budget smartphone launched in india Specifications Features Price

फोटो आणि व्हिडीओसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तसेच 2 मेगापिक्सल डेफ्थ सेन्सर आणि एक QVGA रेझोल्यूशनचा कॅमेरा देण्यात आला आहे.

4/5

infinix note 12i budget smartphone launched in india Specifications Features Price

सेल्फीबरोबरच फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फ्रंटला सेल्फी काढण्यासाठी ड्युएल LED फ्लॅशही देण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.

5/5

infinix note 12i budget smartphone launched in india Specifications Features Price

Infinix Note 12i ची बॅटरी 5,000mAh ची आहे. हा फोन 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या फोनमध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि एक USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1000 nits पीक ब्राइटनेस आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटबरोबरच 6.7 इंचांची फुल HD+ (1,080x2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले गोरिला ग्लास थ्री प्रोटेक्शन असलेला आहे.