भारतातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास महाराष्ट्रातल्या 'या' मार्गावर, अवघ्या 9 मिनिटाच्या प्रवासाचं भाडं ऐकून चक्रावाल

आपण ज्या रेल्वे प्रवासाबद्दल बोलतोय तो प्रवास अवघ्या 3 किमीचा आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास आहे.

| Sep 23, 2024, 17:46 PM IST

Indian Railway Smallest Rail Route:आपण ज्या रेल्वे प्रवासाबद्दल बोलतोय तो प्रवास अवघ्या 3 किमीचा आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास आहे.

1/10

भारतातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास महाराष्ट्रातल्या 'या' मार्गावर, अवघ्या 9 मिनिटाच्या प्रवासाचं भाडं ऐकून चक्रावाल

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

Indian Railway Smallest Rail Route: भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यातून रोज अडीच ते तीन कोटी भारतीय प्रवास करतात. रोज 13 हजारहून अधिक ट्रेन धावतात. काही ट्रेन देशाच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडतात. तर काही ट्रेन शहरांदरम्यान फिरत राहतात. 

2/10

सर्वात छोटा रेल्वे

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

आपण ज्या रेल्वे प्रवासाबद्दल बोलतोय तो प्रवास अवघ्या 3 किमीचा आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास आहे. 

3/10

3 किमी अंतर

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

या प्रवासाला सर्वात छोटा रेल्वे प्रवास म्हटले जाते. या प्रवासात ट्रेन केवळ 3 किमी अंतर पार करते. आता 3 किमीचे अंतर पार करण्यासाठी पायी, सायकल, बाईकनेही जाऊ शकतो, असे तुम्ही म्हणाल. पण ही ट्रेन गर्दीने खचाखच भरलेली असते.

4/10

नागपूर ते अजनी

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

देशातील सर्वात छोटा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी दरम्यानचा आहे. नागपूर ते अजनीच्या दरम्यान अवघे 3 किमी इतक्या मार्गावर ट्रेन चालते. एका मार्गावर एक नव्हे तर अनेक ट्रेन चालतात.   

5/10

ट्रेनचा स्टॉप फक्त 2 मिनिटांचा

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

या स्थानकांवर ट्रेनचा स्टॉप फक्त 2 मिनिटांचा आहे. या स्थानकाचा उपयोग प्रामुख्याने नागपूर मध्य, पश्चिम, दक्षिण-पश्चिम येथून प्रवास करणाऱ्यांना होते. नागपूरला येणारी ट्रेन येथे 80 टक्के रिकामी होते.

6/10

प्रवासासाठी 9 मिनिटांचा वेळ

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

नागपूर ते अजनी दरम्यान अवघ्या 3 किमीच्या प्रवासासाठी 9 मिनिटांचा वेळ लागतो. हा भलेही लहान मार्ग असला तर व्यस्त मार्गांपैकी एक आहे. जिथे ट्रेन खचाखच भरलेली असते.

7/10

जनरल क्लासचे तिकीट 60 रुपये

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

आयआरसीटीसी वेबसाइटवरील माहितीनुसार, नागपूर ते अजनीच्या प्रवासात जनरल क्लासचे तिकीट 60 रुपये आहे तर स्लीपर क्लासचे तिकीट 175 रुपये आहे.थर्ड एसीचे तिकीट 555 रुपये आहे. 

8/10

भाडं खूप जास्त

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

एसी क्लास-2 चे तिकीट 760 रुपये आहे. तर फर्स्ट एसीचे तिकीट 1 हजार 155 रुपये इतके आहे. प्रवास छोटा आहे पण भाडं खूप जास्त आहे. 

9/10

खूप महत्वपूर्ण मार्ग

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

नागपूर आणि अजनीच्या दरम्यान रेल्वे मार्ग भलेही छोटा असला तरी खूप महत्वपूर्ण आहे. ऑफीस, काँलेजला जाणारे तसेच कामावर जाणाऱ्यांसाठी हा मार्ग महत्वपूर्ण आहे. 

10/10

या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन

indian railway shortest train journey Maharashtra Nagpur Ajani Marathi News

या मार्गावर विदर्भ एक्सप्रेस (12106), नागपुर-पुणे गरीब रथ (12114), नागपुर-पुणे एक्सप्रेस (12136) और सेवाग्राम एक्सप्रेस (12140) अशा ट्रेन चालतात.