बाबो... एका चुकीमुळं Indian Railway नं 'या' व्यक्तीच्या नावावर केली संपूर्ण ट्रेन

Indian Railways : अशा या रेल्वेबाबतची काही रंजक सत्य आपल्याला थक्क करतात. अनेकदा तर काही अशा गोष्टी समोर येतात की त्या पाहून आपोआपच आपण म्हणतो, 'It happens only in india'.   

Jul 22, 2023, 12:07 PM IST

Indian Railways : भारतीय रेल्वेचा इतिहास फार जुना आहे. देशाच्या शहरी भागाला अगदी दूरवरच्या खेड्याशी जोडणाऱ्या याच रेल्वेच्या माध्यमातून दर दिवशी मोठ्या संख्येनं नागरिक प्रवास करतात. किंबहुना हा आकदा दिवसागण वाढतानाच दिसत आहे. 

1/7

Indian Railways

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

Indian Railways : जाणून आश्चर्य वाटेल, पण देशात एक अशीही व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे कधी एकेकाळी देशातील एका संपूर्ण रेल्वेचीच मालकी होती. 

2/7

स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

रेल्वे विभागाच्याच एका चुकीमुळं लुधियानातील शेतकरी, संपूर्ण सिंग यांच्या नावे या रेल्वेची मालकी गेली होती. या रेल्वेचं नाव, स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस. दिल्ली- अमृतसर धावणारी ही रेल्वे देशात चर्चेचा विषय ठरली होती.   

3/7

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

आजही ही रेल्वे या मार्गावर प्रवाशांच्या सेवेत रुजू असून, त्या माध्यमातून अनेक प्रवासी अपेक्षित ठिकाणांपर्यंत पोहोचतात. 

4/7

रेल्वेच्या ताब्यात शेतकऱ्यांची जमीन

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

2007 मध्ये रेल्वे विभागानं संपूर्ण सिंग नावाच्या शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेतली होती. ज्यासाठी 25 लाख रुपये प्रती एकर इतकी रक्कमही रेल्वे विभागानं मोजली होती. 

5/7

नुकसानभरपाईची गोष्ट...

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

शेजारील बरवाला गावात मात्र रेल्वे विभागानं जमिनीच्या मोबदल्यात प्रती एकर 71 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. 

6/7

थेट न्यायालय गाठलं

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

हे पाहता संपूर्ण सिंग यांनी थेट न्यायालय गाठलं. ज्यानंतर न्यायालयानं रेल्वे विभागाला त्यांना 1.70 कोटी रुपये रक्कम देण्याचे आदेश दिले. 

7/7

रेल्वेचा मोठा निर्णय

indian railway ludhiana swarna shatabdi express sampuran singh

निर्धारित वेळेत रेल्वेकडून ही रक्कम देण्यात आली नाही, ज्यानंतर काही काळासाठी रेल्वेकडून संपूर्ण सिंग यांच्या नावे एका ट्रेनची संपूर्ण मालकी देण्याचा निर्णय घेण्यात आला.