एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या

Indian Railway ticket: खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाणे परवडत नाही. अशावेळी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी कन्फर्म तिकिट नसल्याने कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण असते. अशा परिस्थितीत लोक तात्काल तिकिट बुक करण्याचा विचार करतात. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नसते. त्यामुळे लोक एजंटांची मदत घेतात.

| Sep 16, 2023, 18:13 PM IST

Indian Railway ticket: सामान्यांना तत्काळ तिकीट मिळत नाही मग ते एजंटना हे तिकिट कसे मिळते? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. एजंट लोक एक ट्रिक वापरतात जी खूप धोकादायक आहे. जी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.  अन्यथा तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. वास्तविक, दलाल आणि त्यांचे एजंट वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करतात. ही तिकिटे २-३ महिने अगोदर बुक केली जातात.

1/10

एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

Indian Railway ticket: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास आता सुरुवात झाली आहे. अनेकांना प्रयत्न करुनही रेल्वेचे तिकिट मिळाले नाही. तर अनेकजणांचे तिकिट अजूनही प्रतीक्षा यादीत दाखवले जात आहे. 

2/10

प्रवास करणे कठीण

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाणे परवडत नाही. अशावेळी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी कन्फर्म तिकिट नसल्याने कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण असते.

3/10

एजंटांची मदत

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

अशा परिस्थितीत लोक तात्काल तिकिट बुक करण्याचा विचार करतात. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नसते. त्यामुळे लोक एजंटांची मदत घेतात. 

4/10

एजंट वापतात ट्रिक

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

सामान्यांना तत्काळ तिकीट मिळत नाही मग ते एजंटना हे तिकिट कसे मिळते? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. एजंट लोक एक ट्रिक वापरतात जी खूप धोकादायक आहे. जी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.  अन्यथा तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. 

5/10

वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

वास्तविक, दलाल आणि त्यांचे एजंट वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करतात. ही तिकिटे २-३ महिने अगोदर बुक केली जातात. 

6/10

लोकांच्या नावे तिकिटे बुक

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

साधारणपणे दलाल 15 वर्षे ते 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांच्या नावे तिकिटे बुक करतात.

7/10

तिकिटावर दुसऱ्याचे नाव

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

ही तिकिटे कोणत्याही नावाने घेतली जातात. याचा अर्थ असा की तुम्हाला मिळालेल्या तिकिटावर दुसऱ्याचे नाव आणि वय लिहिलेले असण्याची शक्यता जवळपास 100 टक्के आहे. 

8/10

एजंटबद्दल सांगतील

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

टीटीई तुम्हाला आयडी वगैरे विचारणार नाही असे सांगून एजंट तिकीट विकतात. ते फक्त यादीतील नाव बघतो आणि पुढे जातात, असेही एजंट सांगतात. 

9/10

त्रास होऊ शकतो

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

पण हे फार क्वचितच घडते. टीटीईला थोडीशीही शंका असल्यास तो लगेच तुमचा आयडी विचारला जातो. तुमची ओळख आयडीसोबत जुळली नाही तर तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

10/10

दंडही भरावा लागेल

Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind

तुम्हाला तुमची सीट तर गमवावी लागेलच. यासोबत दंडही भरावा लागेल. त्यामुळे एजंट्सकडून तिकीट काढण्यापेक्षा वेटिंग किंवा जनरल डब्यातून प्रवास करणे चांगले ठरेल.