'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे.   

Aug 21, 2023, 10:57 AM IST

Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना प्राधान्यस्थानी ठेवण्यात आलं आहे. अशा या रेल्वे विभागाची जगभरात ख्याती आहे. 

1/8

तुम्हाला माहितीये...

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

तुम्हाला माहितीये या रेल्वे विभागातल सर्वाधिक प्राधान्य कोणत्या रेल्वेला दिलं जातं? जाणून आश्चर्य वाटेल, किंबहुना तुम्हाला ही बात कायमच लक्षात ठेवावी लागेल. कारण ही रेल्वेही तितकीच महत्त्वाची आहे.  

2/8

रेल्वे विभागाविषयी थोडं

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

या रेल्वेविषयी जाणून घेण्याआधी रेल्वे विभागाविषयी थोडं जाणून घेऊया. कारण, दर दिवसागणिक या रेल्वे प्रवासात सातत्यानं काही बदल होताना दिसत आहेत.   

3/8

बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

रेल्वे रुळांपासून रेल्वेगाड्यांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. यामुळं प्रवाशांचा प्रवासही सुकर झाला. परिणामी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली.   

4/8

Luxury सुविधा

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

याच रेल्वेकडून सर्व उत्पन्नगटातील प्रवाशांचा विचार केला जातो. ज्या धर्तीवर सर्वसामान्य रेल्वे, मेल, एक्स्प्रेसपासून अगदी Luxury सुविधा असणाऱ्या रेल्वेंचाही समावेश आहे

5/8

एक्स्प्रेस गाड्यांचा वेग

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

एक्स्प्रेस गाड्यांचा वेग पाहता बऱ्याचदा प्रवासी किमान वेळेत अपेक्षित स्थळी कसं पोहोचता येईल याचाच विचार करत राजधानी, शताब्दी किंवा इतर सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना प्राधान्य देतात.   

6/8

सुपरफास्ट रेल्वेगाड्या थांबतात

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

आश्चर्याची बाब म्हणजे या रेल्वेगाड्या कितीही जलद असल्या तरीही एक रेल्वे अशीही आहे जी रुळांवर येताच सुपरफास्ट रेल्वेगाड्या थांबवल्या जातात. अगदी प्रिमियम ट्रेनही यावेळी एका क्षणात थांबतात. 

7/8

या ट्रेनचं नाव आहे...

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

भारतीय रेल्वे विभागातील या ट्रेनचं नाव आहे अॅक्सिडेंट रिलिफ मेडिकल इक्विपमेंट. रेल्वे अपघातांदरम्यान, वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ही रेल्वे सोडली जाते. घटनास्थळी तातडीनं पोहोचण्यासाठी या रेल्वेलाठी रुळ मोकळे ठेवले जातात. 

8/8

राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास

Indian railway highest priority train name and importance  accident relief train

इतकंच नव्हे, तर देशाचे राष्ट्रपती जर रेल्वेनं प्रवास करत असतील तर, त्यांची रेल्वे पुढे जाऊ देण्यासाठीसुद्धा इतर रेल्वेगाड्या थांबवल्या जातात. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये मात्र राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास क्वचितच पाहायला मिळतो.