'एका रात्रीत नोटबंदी, लॉकडाऊन; मग....' कोलकाता रेप केसवर भडकली प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणी संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. देशातील नागरिक आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने सुद्धा या घटनेविरुद्ध आवाज उठवला आहे. 

Aug 25, 2024, 19:33 PM IST
1/6

भारताचा स्टार क्रिकेटर गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा एक डान्सर असून ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. धनश्री देशात, जगात घडणाऱ्या विविध गोष्टींवर आपलं स्पष्ट मत व्यक्त करताना दिसते. 

2/6

कोलकाता आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बॉलिवूड, क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी केली होती. यात जॉन अब्राहम, करीना कपूर, रितिक रोशन, आलिया भट्ट यांचा समावेश होता. 

3/6

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने इंस्टाग्रामवर कोलकाता बलात्कार खून प्रकरणी एक स्टोरी रिशेअर करून पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी  मागणी केली. 

4/6

धनश्रीने रिशेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन लागू शकतो, तर एका रात्रीत बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी का दिली जाऊ शकत नाही". धनश्रीने शेअर केलेली ही स्टोरी इंस्टाग्राम इतर 1 लाख 64 हजार लोकांनी सुद्धा शेअर केली होती. 

5/6

युजवेंद्र चहल याने सुद्धा यापूर्वी कोलकाता बलात्कार खून प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. चहलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, " आरोपीला फाशीवर लटकवा जो पर्यंत तो मरत नाही. 90 डिग्रीमध्ये त्याचे पाय तोडा. त्याच्या मानेचं हाडं मोडा. त्याच्या प्राइवेट पार्टवर जखमा करा. त्याला जिवंत ठेवा जो पर्यंत त्याला हे सर्व टॉर्चर जाणवू शकेल. आणि मग फाशीवर लटकवा".

6/6

धनश्री वर्मा ही डान्सर आणि कोर्यग्राफर असली तरी ती उच्च शिक्षित असून डेंटिस्ट आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न 2020 मध्ये झाले होते.