भारत-कॅनडा वादात अक्षय कुमार ट्रोल! Memes चा पडला पाऊस; पाहा मिम्स, जाणून घ्या कारण
India vs Canada Issue Akshay Kumar: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत काही निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. मात्र या सर्व वादामध्ये अभिनेता अक्षय कुमारला ट्रोल केलं जात आहे. नेमकं घडलंय काय आणि लोकांचं म्हणणं काय हे पाहूयात...
1/18
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
2/18
ट्रूड्रो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात परत पाठवलं. यावरुनच आता दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु झाला आहे. कॅनडाने अगदी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नका तिथे दहशतवादाला धोका आहे अशा सूचनाही या वादानंतर आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या आहेत. एकीकडे या वादाचे गंभीर पडसाद पडत असताना दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार यावरुन ट्रोल होताना दिसत आहे.
3/18