गौराईच्या नैवेद्यासाठी बनवा ज्वारीचे आंबील, पाहा ही रेसिपी

गणरायाच्या आगमनापाठोपाठ गुरुवारी 21 सप्टेंबरला गौराईचेदेखील आगमन होते. तर, 22 सप्टेंबरला गौराईचे पूजन केले जाते. तीन दिवस गौराईचा पाहुणचार केल्यानंतर विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात विविध प्रकारे गौराईची स्थापना केली जाते. प्रत्येक प्रांतानुसार गौरीचे पूजन व नैवेद्याचा प्रकारही बदलत जातो. यंदा गौरीला आवडणारा एक खास पदार्थ जाणून घेऊया. 

| Sep 20, 2023, 13:07 PM IST

1/7

गौराईच्या नैवेद्यासाठी बनवा ज्वारीचे आंबील, पाहा ही रेसिपी

jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या गौरींची स्थापना केली जाते. खड्याच्या, फुलांच्या, उभ्या गौरी, जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मी तर कुणा  कुणाकडे  फक्त एकच गौरी घरी येते. गौरी दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी माहेरपणाला येते, अशी मान्यता आहे. यादिवशी गौराईसाठी खास नैवेद्य केला जातो. विदर्भात या सणाला महालक्ष्मींचा सण म्हटले जाते. यादिवशी आंबील आवर्जुन केले जातात. हे आंबील कसे बनवले जातात हे जाणून घेऊया. 

2/7

आंबिल कसे बनवायचे

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

गौरीच्या नैवेद्यात ज्वारीचे आंबिल बनवले जातात. प्रत्येकाकडे आंबिल बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी फोडणीची आंबिल बनवली जाते तर काही ठिकाणी साधी (पांढरी आंबिल बनवतात. आता आंबिल कसे बनवायचे जाणून घेऊया.

3/7

साहित्य

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

४-५ टेबलस्पून ज्वारीचे पीठ,५ टेबलस्पून दही,२ टेबलस्पून शेंगदाणे,थोडसे खोबऱ्याचे काप,५-६ कढीपत्त्याची पाने,१ टिस्पुन मोहरी,१ टेबलस्पून तिळ,१/२ टीस्पून हिंग,२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,१ टेबलस्पून तेल,चवीनुसार मीठ,पाणी

4/7

रात्रभर भिजवत ठेवावे

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

सर्वप्रथम ज्वारीच्या पीठात पाणी घालून व्यवस्थित एकजीव करुन चांगले मिक्स करुन रात्रभर भिजवत ठेवावे. दुसऱ्या दिवशी या भिजवलेल्या पिठात दही घालावे. त्यानंतर एका भांड्यात तेल घेऊन चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडलीकी त्यामध्ये हिंग, कढिपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा मिरचीचा ढेचा, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, तिळ घालून एक मिनिटापर्यंत सर्व जिन्नस परतून घ्यावेत. 

5/7

आंबील शिजवून घ्यावी

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

पॅनमधील सर्व जिन्नस चांगले परतून घेतल्यानंतर दोन ग्लास पाणी घालून उकळी काढून घ्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करुन त्यात हळूहळू ज्वारीचे पीठ घाला. ज्वारीचे पीठ घालताना एका हाताने ढवळत राहा जेणेकरुन गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर यात मीठ घालून दोन ते तीन मिनिटांपर्यंत आंबील शिजवून घ्यावी. 

6/7

पांढरी आंबील

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

पांढरी आंबील करताना फक्त दूध, पाणी, मीठ साखर इतक्याच साहित्यांची गरज भासते. फोडणी देत असताना फक्त पाण्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून आंबीलची फोडणी देतात. गरज असल्यास दूधदेखील घातले जाते. 

7/7

टिप

 jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad

पारंपारिक पद्धतीने आंबील करायची झाल्यास सर्वात पहिले ज्वारीवर पाण्याचा हबका मारून ती कुटली जाते. त्यानंतर चाळून त्यावरील टरफलं काढली जातात आणि उर्वरीत ज्वारी दळली जाते. घरच्या मिक्सरवरही बारीक केल्यास हरकत नाही.