अवघ्या काही मिनिटांची फी 30000000 रुपये! धर्म बदलून बनला मुस्लीम, मुकेश अंबानीही याचे फॅन

आधीच्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे.

Pravin Dabholkar | Nov 11, 2024, 18:07 PM IST

India Highest Paid Singer: आधीच्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे.

1/10

अवघ्या काही मिनिटांची फी 30000000 रुपये! धर्म बदलून बनला मुस्लीम, मुकेश अंबानीही याचे फॅन

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

India Highest Paid Singer: सिनेमाची कहाणी जशी लोकांना बांधून ठेवते त्याप्रमाणे त्यातील गाणीदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. काही सिनेमा तर त्याच्या स्टोरीपेक्षा गाण्यामुळे प्रसिद्ध असतात.या गाण्यांना आवाज देणाऱ्या सिंगर्सचे नशीबदेखील वेळेनुसार बदलत जाते. 60 व्या दशकात लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने साऱ्यांना मंत्रमुग्ध केल तसेच सिनेविश्वात मोठा काळ राज्य केले.

2/10

काही मिनिटांच्या गाण्यासाठी इतकी फी

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

त्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे. हा सिंगर सिनेमातील काही मिनिटांच्या गाण्यासाठी इतकी फी घेतो की तुम्ही विचारही नाही करु शकत. हा सिंगर म्हणजे अरिजित सिंह, सोनू निगम किंवा श्रेया घोषाल नाही तर वेगळाच कोणीतरी आहे.

3/10

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

भारतात गाण्यासाठी सर्वाधिक फी घेणारा एकमेव गायक दुसरा कोणी नसून ए.आर. रहमान आहे. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एआर रहमान गाण्यासाठी इतर गायकांपेक्षा जास्त फी घेतो. रहमान बहुतेक स्वतःची गाणी गातो. पण त्याने दुसऱ्याच्या गाण्याला आवाज दिला तर निर्माते त्याला भरमसाठ फी देतात. फिल्म इंडस्ट्रीच्या अंतर्गत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

4/10

एका गाण्याची फी 3 कोटी रुपये

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

एआर रहमान एका गाण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये घेतो. विशेष म्हणजे तो पूर्णवेळ गायक नाही. गायक असण्यासोबतच तो संगीतकार आणि गीतकार देखील आहे. विशेष म्हणजे एआर रहमानच्या आवाजाने अंबानी कुटुंबही मंत्रमुग्ध झाले आहे.

5/10

अनंत अंबानींच्या लग्नात गायले

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

एआर रहमान आणि श्रेया घोषाल यांनाही राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने आमंत्रित केले होते. जिथे दोघांनी मिळून 'बरसों रे मेघा' आणि 'तेरे बिना' ही गाणी रिक्रिएट केली. ए आर रहमानच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये 'मसकली', 'सान सनान सना', 'रांझना', 'जय हो', 'कुन फया कुन', 'रोजा' आणि 'मां तुझे सलाम' या गाण्यांचा समावेश आहे.

6/10

2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

एआर रहमानच्या नावावर 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहेत. पहिला रेकॉर्ड 'वंदे मातरम' गाण्याच्या नावावर आहे. हे गाणे त्यांने अनेक भाषांमध्ये गायले आहे. दुसरा विक्रम मूळ गाणी रचण्याचा आहे.

7/10

श्रेया आणि सुनिधी

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

रिपोर्ट्सनुसार, एआर रहमाननंतर श्रेया घोषाल एका गाण्यासाठी जवळपास 25 लाख रुपये घेते. यात सुनिधी चौहान तिसऱ्या क्रमांकावर आहे. ती एका गाण्यासाठी सुमारे 18 ते 20 लाख रुपये फी घेते. 

8/10

अरिजित सिंग आणि सोनू निगम

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

या यादीत अरिजित सिंग चौथ्या क्रमांकावर असून तोदेखील 20 लाखांपर्यंत फी घेतो. तर पाचव्या क्रमांकावर सोनू निगम आहे. जो एका गाण्यासाठी 15 ते 18 लाख रुपये घेतो.

9/10

धर्म बदलला

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

ए आर रहमानचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता पण त्यांच्या कुटुंबाने 1988 मध्ये मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांनी एएस दिलीप कुमार हे नाव बदलून अल्लाह रखा रहमान केले. रेहमानने धर्म बदलला तेव्हा तो 23 वर्षांचा होता.

10/10

खुलेपणाने भाष्य

India Highest Paid Singer AR Rehman Fees Career Entertainment Marathi News

इस्लामचा स्वीकार करण्याबाबत बीबीसीच्या एका टॉक शोमध्ये त्यांने खुलेपणाने भाष्य केले होते. एका सुफीने माझ्या वडिलांवर उपचार केले. खूप वर्षांनी ते भेटले. त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन आम्ही इस्लाम स्वीकारल्याचे एआयर रहेमानने सांगितले होते.