IND vs ZIM : एक शर्मा गेला, पण दुसरा आला! दुसऱ्याच सामन्यात मोडला 'हिटमॅन'चा रेकॉर्ड

IND vs ZIM 2nd T20I Abhishek Sharma : अभिषेक शर्माने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं अन् शतक पूर्ण केलं. यामध्ये 8 सिक्स आणि 4 फोरचा समावेश आहे. यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड नावावर केलेत.

| Jul 07, 2024, 23:59 PM IST
1/5

पहिला फलंदाज ठरला

सर्वात कमी डावात टी-20 शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. ही त्याची फक्त दुसरी खेळी होती. तर दीपक हुडाने शतक झळकावण्यासाठी 3 डाव घेतले. केएल राहुलने चौथ्या डावात शतक झळकावले होते.

2/5

तिसरं जलद शतक झळकावणारा खेळाडू

अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरं जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी रोहितने 35 बॉलमध्ये अशी कामगिरी करून दाखवली होती. तर, सूर्यकुमारने 45 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. केएल राहुलने देखील 46 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती.

3/5

चौथा सर्वात तरुण खेळाडू

अभिषेक शर्मा हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला.  वयाच्या 23 वर्षे 307 दिवसात त्याने ही कामगिरी करून दाखवली. दुसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आहे, ज्याने वयाच्या २३ वर्षे १४६ दिवसांत शतक झळकावलं होतं.

4/5

रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेकने त्याच्या डावात 8 षटकार ठोकले आणि त्यानंतर तो 2024 साली टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. यावर्षी टी-20 मध्ये रोहित शर्माने एकूण 46 षटकार मारले होते, मात्र आता अभिषेकच्या नावावर एकूण 50 षटकार झाले असून तो रोहित शर्माच्या पुढे गेलाय.

5/5

शेवटच्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावा

दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात 160 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात शेवटच्या 10 षटकांमध्ये केलेल्या धावांची ही सर्वाधिक धावा आहे. या सामन्यापूर्वी 2007 मध्ये श्रीलंका आणि केनिया यांच्यातील सामन्यात 159 धावांची सर्वोच्च धावसंख्या होती.