IND vs ENG | हे 5 खेळाडू ठरले भारतासाठी LUCKY

Feb 16, 2021, 22:45 PM IST
1/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

भारतीय टीमचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आजच्या या मॅचमधे जगाला दाखवून दिले की तो खरोखरच क्रिकेटचा स्टार आहे. रोहितने चेन्नईत झालेल्या मॅचमधे भारताच्या पहिल्या डावात 161 धावा करत शानदार शतक झळकावले. रोहितच्या या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 329 धावा करता आल्या.  

2/5

विराट कोहली

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (VIRAT KOHLI) पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावात 72 धावा केल्या, पण इतर कोणत्याही फलंदाजाने विशेष कामगिरी केली नसल्यामुळे भारताने तो कसोटी सामना गमावला होता. त्या सामन्याच्या पहिल्याचं डावात कोहली शून्यावर बाद झाला. पण दुसऱ्या सामन्याच्या दुसर्‍या डावात जेव्हा सर्व फलंदाज सतत आउट होत तेव्हा कोहलीने चांगली फलंदाजी करून दुसर्‍या डावात 62 धावांचे योगदान दिले

3/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील विजयात नायक ठरलेला टीम इंडियाचा अष्टपैलु फलंदाज रिषभ पंतही (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी खेळत आहे. पंतने या सामन्याच्या पहिल्या डावात 58 धावांची शानदार खेळी खेळली. या सामन्यात फलंदाजीपेक्षा पंतने विकेटच्या मागे योगदान दिले. खराब विकेटकीपिंगमुळे ट्रोल होत असलेल्या पंतने या सामन्यात उत्तम विकेटकीपिंग केली.  

4/5

अक्षर पटेल

अक्षर पटेल

पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या (Axar Patel) पटेलने या सामन्यात पदार्पण केले. अक्षरने या सामन्याच्या दुसर्‍या डावात 5 विकेट्स घेतल्या, त्याने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतले होते. विशेष म्हणजे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा दोन्ही मॅचमध्ये . विकेट घेतली.

5/5

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताच्या अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनसाठी (Ravichandran Ashwin) विस्मरणीय होता. या कसोटी सामन्यात अश्विनने बॉलिंग आणि बॅटींगने चांगली कामगिरी केली. अश्विनने भारताच्या दुसर्‍या डावात 106 धावा करत शानदार शतक झळकावले आणि इंग्लंडसोबतच्या पहिल्या डावात 5 विकेट्स ही घेतल्या. एवढेच नव्हे तर अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही 3 विकेट्स घेतल्या.