आत्महत्येपूर्वी संदीपने शेअर केला एक व्हिडिओ, पत्नीबाबत केला होता हा खुलासा

Feb 16, 2021, 22:23 PM IST
1/10

आणखी एका कलाकाराच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं. आत्महत्येपूर्वी संदीप एक व्हिडिओ शेअर करत तो आत्महत्या का करत आहे. याबाबत खुलासा केला होता.

2/10

संदीपच्या सोशल मीडिया प्रोफाईल पाहिले तर त्याचे पत्नीशी असलेले त्याचे संबंध खूप चांगले आहेत असं फोटोतून दिसत होते.    

3/10

हे सर्व फोटो संदीप नहार यांनी गेल्या 1-2 वर्षात शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे सांगत आहे की गेल्या दोन वर्षांपासून कंचन आणि त्याच्यात भांडणं सुरू होते.

4/10

या फोटोमध्ये ते आनंदी दिसत आहेत. पण सत्य काही तरी वेगळंच होतं. असं देखील त्याने म्हटलं आहे.  

5/10

या फोटोमध्ये संदीप आणि कंचन वेकेशन काळात सोबत मस्ती करताना दिसत आहेत.

6/10

या फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत, कपाळावरचा लाल टिळा घरी पुजा असल्याची साक्ष देत आहे.

7/10

हे फोटो पाहून, विश्वास ठेवणे अशक्य आहे की, संदीप आपल्या पत्नीबरोबर सुरु असलेल्या वादामुळे तणावात होता. ज्यामुळे त्याने आत्महत्या केली.

8/10

व्हिडिओमध्ये संदीप म्हणाला, 'मी दीड वर्षांपासून मानसिक त्रासात आहे. मी माझ्या पत्नीला वारंवार समजावून सांगितले तरी ती 365 दिवस भांडण करत असते. रोज आत्महत्येची गोष्ट करते, मी मरेण आणि तुला अडकवेन असे सतत बोलत असते. मी अस्वस्थ आहे. माझ्या कुटुंबावर ती अत्याचार करते आणि माझ्या आईला शिवीगाळ करते.'

9/10

या व्हिडिओमध्ये संदीप पुढे म्हणाला, 'मला घरातल्यांसोबत सुद्धा फोनवर बोलायला देत नाही. माझे नाव कोणाशीही जोडते आणि खराब करते. सारखी आमची भांडणं होत होती. ती नुकतीच घरून पळून गेली होती मी तीला शोधुन आणले. तिची आई तिला साथ देते आणि माझ्यावर केस करण्याची धमकी ही देते.'

10/10

व्हिडिओमध्ये संदीप पुढे म्हणाला, 'कंचनचं 2015-16 मध्ये एक अफेअर होतं, त्याच्या सोबत ती 6 वर्षे होती. तीने त्याला एका खोट्या केस मध्ये तुरूंगात पाठवले होते, तीच्यावर दया दाखवून मी तिच्याशी लग्नं केलं होत.'