Ind vs Eng: तिसऱ्या वन डे सामन्यातील 5 Turning Points ज्यामुळे विजय मिळाला

भारतीय संघानं रंगपंचमीपूर्वी आनंदाची बातमी दिली. तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी, टी 20 आणि वन डे सीरिजवर टीम इंडियानं विजय मिळवला आहे.

Mar 29, 2021, 15:52 PM IST
1/5

पंत-पांड्याच्या भागीदारीचा मोठा वाटा

पंत-पांड्याच्या भागीदारीचा मोठा वाटा

जेव्हा टीम इंडियाच्या 4 विकेट्स गेल्या तेव्हा फक्त 157 धावांवर होते. एक क्षण सर्वांना वाटलं हा सामना हातून निसटणार. पण ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या ताऱणहार ठरले आणि त्यांनी वेगळीच दिशा दिली. पंतने 62 चेंडूत 78 धावा आणि पांड्याने 44 चेंडूत 64 धावा केल्या. या दोघांमध्ये 99 धावांची भागीदारी केली.

2/5

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

या सामन्यात शार्दुल ठाकूर 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या. शार्दुलने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. यामुळे टीम इंडिया 329 धावा करू शकली.

3/5

रॉय आणि बेअरस्टो तंबूत परतणं फायद्यात पडलं

रॉय आणि बेअरस्टो तंबूत परतणं फायद्यात पडलं

भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला सुरुवातीचा धक्का देत दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेसन रॉय 14 आणि जॉनी बेअरस्टो अवघ्या 1 धावांवर बाद झाले. 28 च्या स्कोअरवर इंग्लंडच्या 2 विकेट पडल्यानंतर संघातील फळी थोडी डळमळीत झाली.

4/5

हार्दिक पांड्याची गोलंदाजी

हार्दिक पांड्याची गोलंदाजी

12 चेंडूंमध्ये इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. तेव्हा शेवटून दुसरी म्हणजे 49 वी ओव्हर हार्दिक पांड्याला खेळण्यासाठी दिली. पांड्यानं आपल्या गोलंदाजीनं कमाल केली आणि केवळ 5 धावा इंग्लंडच्या संघाला काढता आल्या. त्यामुळे इंग्लंड संघावरील दबाव वाढला. 

5/5

शेवटच्या ओवरमध्ये वुड आऊट

शेवटच्या ओवरमध्ये वुड आऊट

विराट कोहलीने शेवटच्या ओव्हरमध्ये टी नटराजनवर सामना सोपवला. 6 चेंडूंमध्ये इंग्लंडला 12 धावांची आवश्यकता होती. सॅम करन क्रिझवर असताना त्याला रन काढण्याची संधी कमी देण्याचं आणि काढलाच तर रन आऊट करण्याचा दबाव होता. दुसऱ्या चेंडूवर करन धावण्यासाठी निघाला आणि मार्क वुड रनआऊट झाला. या विकेटमुळे इंग्लंडचं मनोधैर्य खचलं आणि टीम इंडियाला यश मिळालं.