IND VS AUS तिसऱ्या टेस्ट मॅचमुळे फॅन्सची झोपमोड होणार, किती वाजता आणि कुठे पाहता येणार Live?

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. दरम्यान या सीरिजमध्ये दोन टेस्ट सामने पूर्ण झाले असून पर्थ येथील सामना हा भारताने तर एडिलेडमध्ये झालेला सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यामुळे सीरिज ही 1-1 अशा बरोबरीत आहे. 

| Dec 10, 2024, 15:59 PM IST
1/7

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा टेस्ट सामना हा ऑस्ट्रेलियातील गाबा येथे खेळवला जाणार आहे. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान हा सामना होणार असून हा सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. 

2/7

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या प्रसिद्ध गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येणारा तिसरा टेस्ट सामना हा शनिवार 14 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरु होईल. म्हणजेच याचा टॉस टाइम हा 5 वाजून 20 मिनिटांचा असेल.  

3/7

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे दोन सामने झाले त्यावेळी भारतीय प्रेक्षक हे दिवसभरात अगदी सहज सामने पाहू शकत होते. मात्र आता गाबा स्टेडियमवर होणार तिसरा सामना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांची झोपमोड होणार आहे.  अन्यथा असं होऊ शकतं की सकाळी नेहमीप्रमाणे उशीरा उठल्यावर खूप धावा झाल्या किंवा खूप विकेट पडल्या असू शकतात. 

4/7

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल :

टीम इंडियाचा एडिलेड येथे खेळलेल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाल आता गाबा येथे होणारा सामना जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये महत्वाचे बदल करू इच्छितो. 

5/7

एडिलेड सामन्यात गोलंदाज हर्षित राणा याला एकही विकेट मिळवणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आर अश्विन, बुमराह, सिराज यांच्या सपोर्टसाठी आकाश दीप याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. तसेच रोहित शर्मा हा दुसरा टेस्ट सामन्यात नंबर 6 वर खेळण्यासाठी उतरला होता. मात्र यावेळी तो फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे गाबा टेस्टमध्ये तो पुन्हा ओपनिंग करताना दिसू शकतो. 

6/7

कुठे पाहता येणार सामना?

एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. 

7/7

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

 रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, आकाश दीप , मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह