घरं आहे की हॉटेल; एका जोडप्याची तब्बल 22 मुलं

ब्रिटनमधील सर्वात मोठं कुटुंब: पालकांना एक किंवा दोन मुलं सांभाळणंही किती कठीण जातं. पण ब्रिटनमधील या जोडप्याला तब्बल 22 मुलं आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. रोजच्या जीवनात त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.  

| Dec 03, 2024, 17:48 PM IST
1/7

ब्रिटनमधील सर्वात मोठं कुटुंब: पालकांना एक किंवा दोन मुलं सांभाळणंही किती कठीण जातं. पण ब्रिटनमधील या जोडप्याला तब्बल 22 मुलं आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. रोजच्या जीवनात त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.  

2/7

स्यू आणि नोएल रेडफोर्ड हे लँकेशायरमध्ये राहणारे दांपत्य आहे, ज्यांना 22 मुलांचं संगोपन करावं लागतंय. त्यांचा आठवड्याचा जेवणाचा खर्च 41 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सुट्टीच्या काळात हा खर्च आणखी वाढतो. घरामध्ये एका आठवड्यासाठी किमान 3 टूथपेस्ट लागतात. 

3/7

या कपलला कुटुंबासोबत फिरण्यासाठी एक मोठी बस ठेवावी लागते. कुठेही बाहेर जाताना केवळ बसचीच सोय करावी लागत नाही, तर मुलांवर लक्ष ठेवणंही खूप मेहनतीचं काम ठरतं

4/7

या मोठ्या कुटुंबात दिवसाला 5-6 वेळा वॉशिंग मशीन चालवावी लागते. त्यामुळे कपडे धुण्याचं काम अतिशय मेहनतीचं ठरतं. त्यांनी घराच्या बेसमेंटमध्ये 18 किलो क्षमतेचं वॉशिंग मशीन बसवलं आहे. 

5/7

सुदैवानं, या कुटुंबाचा पाय शॉपचा(PIE) मोठा व्यवसाय आहे, ज्यामुळे त्यांना या खर्चाचं नियोजन करणं शक्य होतं. त्यांचं मोठं घर १० बेडरूम्सचं आहे, ज्यामध्ये एक सिनेमा रूम आणि टीव्ही बेडही आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हर कारसुद्धा आहे. 

6/7

'22 किड्स अँड काउंटिंग' या कार्यक्रमाद्वारे या कुटुंबाची लोकप्रियता वाढली. स्यूने सांगितलं की, आतापर्यंत त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी तब्बल £1 मिलियन (१० कोटी रुपयांपेक्षा जास्त) खर्च केले आहेत. 

7/7

या कुटुंबातील सर्वांत मोठा मुलगा ख्रिस 35 वर्षांचा आहे, तर सर्वांत लहान मुलगी हेडी फक्त 4 वर्षांची आहे. दुर्दैवानं, त्यांच्या एका मुलीचं निधन झालं आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी स्यू सातत्यानं गरोदर राहिली, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.