जगातले असे देश जिथे कधीही होत नाही रात्र, 24 तास लख्ख प्रकाश; नाव वाचल्यावर तुम्हालाही होईल आश्चर्य

In This Countries Sun Does not Rise: सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे आपण लहाणपणापासून ऐकत आलो आहोत. दिवसभरातील 24 तासांमध्ये फक्त 12 तास सूर्य प्रकाश असतो आणि बाकीवेळ रात्र असते. पण जगातील असे देश आहे. जिथे 70 दिवस सूर्यास्त होत नाही. 

| Oct 12, 2024, 18:13 PM IST
1/7

हे वाचून तुम्हालाही आश्चर्य झालं असेल की असं कसं शक्य आहे. सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळ झाली की सूर्यास्त होतो हे आपल्याला माहित आहे. पण असं एक ठिकाण आहे जिथे 70 दिवस सूर्यास्त होत नाही. चला तर ते ठिकाण कुठे आहे ते जाणून घेऊया. 

2/7

नुनावुत (कॅनडा)

या ठिकाणी आर्कटिक सर्किलशी 2 डिग्री पेक्षा जास्त आणि कॅनडाच्या उत्तर पश्चिम परिसरात असलेल्या या ठिकाणी दोन महिने 24 तास आणि आठवड्यातील सात दिवस सुर्यास्त होत नाही. तर हिवाळ्यात 30 दिवस अंधार राहतो.   

3/7

बॅरो, अलास्का

मे महिन्याच्या शेवटी पासून जुलैच्या शेवटपर्यंत सूर्यास्त होत नाही. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढचे 30 दिवस सूर्योदय होत नाही. त्याला पोलर नाइट बोलतात. त्याचा अर्थ हा आहे की हा देश हिवाळ्यात अंधाऱ्यात राहतो. 

4/7

आइसलॅंड

आइसलॅंड ग्रेट ब्रिटेननंतर यूरोपचा सगळ्यात मोठा आयलॅंड आहे. या देशात मच्छर देखील नाही. जून महिन्यात सूर्यास्त होत नाही.   

5/7

नॉर्वे

आर्कटिक सर्कलमध्ये असलेल्या या देशाला लॅन्ड ऑफ द मिडनाइट सन म्हणून ओळखतात. इथे मे महिन्यापासून जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ या देशात 76 दिवसाच्या काळात सूर्यास्त होत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये सूर्य 10 एप्रिल ते 23 ऑगस्ट पर्यंत सूर्य आकाशात लख्ख दिसतो. 

6/7

फिनलॅंड

इथे तुम्हाला हजारो आयलॅंड आणि तलाव आहेत. उन्हाळ्यात फिनलॅंडमध्ये लागोपाठ 73 दिवस सूर्य आकाशात दिसतो. तर थंडीच्या काळात सूर्योदय होत नाही. 

7/7

स्वीडन

मे महिन्याच्या सुरुवातीला ऑगस्टच्या शेवटपर्यंत स्वीडनमध्ये सूर्य मध्यरात्रीच लपतो आणि सकाळी 4 वाजता पुन्हा सुर्योदय होतो. या देशात लागोपाठ 6 महिने सुर्योदय होतो.