सुनील दत्तमुळे रेखाने नाकारली भूमिका, चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका, बजेटपेक्षा 7 पट जास्त केली कमाई

1976 मध्ये एक चित्रपट आला होता. या चित्रपटात सुनील दत्तमुळे रेखाने नाकारली होती भूमिका. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रदर्शित होताच उडाला धमाका. चित्रपटाने बजेटपेक्षा 7 पट अधिक केली कमाई. 

| Aug 03, 2024, 20:38 PM IST
1/6

7 पट अधिक कमाई

सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांचा 48 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 1.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करुण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर 7 पट अधिक कमाई केली होती. 

2/6

नवीन अभिनेत्रीला प्रसिद्धी

सुनील दत्तसोबत रेखाने भूमिका करण्यास नकार दिल्यानंतर एका नवीन अभिनेत्रीला या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. त्यानंतर याच चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. 

3/6

चित्रपटात 11 कलाकार

1976 मध्ये प्रदर्शित झालेला 'नागिन' हा चित्रपट होता. या चित्रपटात 11 कलाकार होते. अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास नकार दिला होता. 

4/6

रीना रॉय

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी नवीन अभिनेत्री म्हणजे रीना रॉय. या चित्रपटातील अभिनयाने ती रातोरात स्टार झाली. 

5/6

सुनील दत्त विरुद्ध भूमिका

याच चित्रपटात रेखाने सुनील दत्तच्या विरुद्ध भूमिका साकारली होती. रेखाने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असती तर ती हिट लिस्टमध्ये आली असती. 

6/6

हिट चित्रपट

1976 मधील 'नागिन' हा तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. यानंतर इच्छाधारी नागिनवर अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका तयार झाल्या.