बॉलिवूडमध्ये पहिलाच चित्रपट अन् 'या' अभिनेत्रीनं वाढवली तिप्पट मानधनाची रक्कम

नितेश तिवारीच्या 'रामायणा'च्या चर्चांनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातही खळबळ उडवून दिली आहे. बॉलिवूड स्टार्ससोबतच दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटाचा भाग असल्याची चर्चा आहे. रणबीर कपूर रामची भूमिका साकारणार आहे, तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असून, ती या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Diksha Patil | Apr 06, 2024, 18:52 PM IST
1/7

'रामायण' चित्रपट

चित्रपटानं केवळ त्याच्या कास्टिंगसाठीच नव्हे तर मुख्य कलाकारांना मिळणाऱ्या फीसाठी देखील लक्ष वेधले आहे.

2/7

साई पल्लवी

साई पल्लवीने 'रामायणा'तील सीतेच्या भूमिकेसाठी नेहमीपेक्षा तिप्पट मानधनाची मागणी केली असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला या भूमिकेसाठी 10 कोटी रक्कम देण्यात आली आहे. तर तेलुगू चित्रपटांसाठी साई नेहमीच्या 3 ते 4 कोटी फी घेत असल्याचं सांगितले जातं. 

3/7

सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

रामायणाच्या सेटवरील लीक झालेल्या प्रतिमा आणि व्हिडिओ अलीकडेच समोर आले आहेत, ज्यात अरुण गोविल दशरथ आणि लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत आहेत. शबाना आझमी कथितपणे शुर्पणखाची भूमिका साकारत आहेत, तर कन्नड स्टार यश रावणाची भूमिका साकारत आहे. 

4/7

साईचा आगामी प्रोजेक्ट

रामायण व्यतिरिक्त, साई पल्लवीच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये शिवकार्तिकेयन सोबत तामिळ चित्रपट 'अमरन' चा समावेश आहे. ज्याचा टीझर अलीकडेच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये तिची एकल प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

5/7

साईचा चित्रपट

समीक्षक आणि प्रेक्षकांनी तिच्या मागील चित्रपट 'गर्जी' मधील तिच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे आणि दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड या दोन्ही उद्योगांमध्ये तिची वाढती मागणी तिची वाढती लोकप्रियता आणि प्रतिभा दर्शवते.  

6/7

व्हायरल फोटोनंतर नितेश यांचा निर्णय

'इंडिया टुडे' नं दिलेल्या रिपोर्टनुसार, नितेश यांनी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेटवर असलेल्या कॅमेरा पर्सन, क्रू आणि असिस्टंट डायरेक्टर्सला समन्स पाठवले आहे.

7/7

(All Photo Credit : Social Media)