...तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करु - रामदास आठवले

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झाल्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार नॉटरिचेब झाल्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार की काय चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. मात्र तब्येत बरी नसल्याचे सांगत अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Apr 13, 2023, 18:59 PM IST
1/8

ajit pawar anjali damania

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा दमानिया यांनी केला होता.

2/8

ajit pawar sharad pawar

या दाव्यानंतर अजित पवार भाजपबरोबर जाणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी मला माहिती नाही म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले होते.

3/8

ramdas athawale offer cm post to ajit pawar

त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच आता रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

4/8

ajit pawar DCM

गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार हे काम करत आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अनेक पदे देऊन अनेक वेळा न्याय देण्याचे काम केले आहे. 

5/8

ramdas athawale on ajit pawar

मध्यंतरी अजित पवार हे आजारी होते. त्यामुळे त्यांचा फोन बंद असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. 

6/8

ramdas athawale on devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली मैत्री असून त्या दोघांनी यापूर्वी एकत्रित शपथ घेतली आहे. पण अजित पवार हे माझ्या पक्षात आल्यावर मला खूप आनंद होईल आणि त्यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  

7/8

ramdas athawale on eknath shinde

आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील. उद्धव ठाकरेंना कंटाळून ते गेले, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

8/8

ramdas athawale uddhav thackeray

एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत.आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. ते रडले म्हणून उध्दव ठाकरे पडले, असेही रामदास आठवले म्हणाले.