शानदार, दमदार, जबरदस्त! भारत-पाक सामन्यासाठी मोदी स्टेडिअमवर गर्दीचा रेकॉर्ड... पाहा Unseen Photo

राजीव कासले | Oct 14, 2023, 15:47 PM IST
1/7

भारतात क्रिकेट धर्म मानला जातो. त्यातही भारतात विश्वचषक स्पर्धा आणि त्यातही भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी दिवाळी-दसराच. भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारपासूनच गर्दी जमू लागली.  (सौजन्य - EspnCricinfo)

2/7

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता जवळपास एक लाख तीस हजार इतकी आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमपैकी हे एक आहे. भारत-पाक सामन्यासाठी हे संपूर्ण स्टेडिअम क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरलं होतं. सर्वत्र निळा सागर पसल्याचा भास होत होता.  (सौजन्य - EspnCricinfo)

3/7

नरेंद्र मोदी स्टेडिअम सर्वत्र तिरंगा झळकताना दिसले. टीम इंडियाच्या घोषणांनी नरेंद्र मोदी स्टेडिअम दुमदुमून गेलं होतं.   (सौजन्य - EspnCricinfo)

4/7

सामन्याच्या सुरुवातीला भारतरत्न सचिन तेंडुलकर हाता विश्वचषक ट्रॉफी घेऊन मैदानात एन्ट्री मारली. या सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गोल्जन तिकिट देऊन खास आमंत्रित करण्यात आलं आहे.  (सौजन्य - EspnCricinfo)

5/7

सामन्याच्या आधी टीम इंडियातले खेळाडू भगव्या जर्सती सराव करताना दिसले. यावेळी खेळाडू धमाल मस्ती करतानाही दिसले. विराट कोहली, शुभमन गिल, आर अश्विन मनमोकळेपणाने हसताना कॅमेऱ्यात कैद झाले.  (सौजन्य - EspnCricinfo)

6/7

भारत-पाकिस्तान सामन्यात रोहित शर्मा टॉस का बॉस ठरला. त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  (सौजन्य - EspnCricinfo)

7/7

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिल्ं. त्याने सलामीला आलेल्या पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीकला बाद केलं. त्यानंतर सिराजने केलेला जल्लोष कॅमेऱ्याने टिपला आहे.  (सौजन्य - EspnCricinfo)